हाँगकाँग मुद्द्यावरून अमेरिकेचा चीनला इशारा | पुढारी

हाँगकाँग मुद्द्यावरून अमेरिकेचा चीनला इशारा

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

लोकशाही समर्थक चार खासदारांना वगळल्यानंतर हाँगकाँगच्या स्वायत्ततेचा भंग झाल्याचं सांगून अमेरिकेने गुरुवारी हाँगकाँगच्या मुद्द्यावरून चीनला चेतावनी दिली आहे. तसेच चीनवर आणखी निर्बंध घालतले जातील असा इशाराही अमेरिकेने दिला आहे. या मुद्द्यांवर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन म्हणाले की, हाँगकाँगमधील चीनच्या ताज्या वर्चस्व वादावरून, असे दिसून येते आहे की एक देश दोन व्यवस्था राबविण्यासाठी हुकुमशाहीचा अवलंब करत आहे.

वाचा : भारत, चीन रोज ३०% सैनिक मागे घेणार; तणाव निवळणार

रॉबर्ट ओ ब्रायन पुढे म्हणाले, चीनच्या अलीकडील कृतींमुळे हाँगकाँगच्या लोकशाही समर्थक आमदारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. असे करून चिनी कम्युनिस्ट पक्षाने (सीसीपी) त्याच्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेचे उल्लंघन केले आहे. अमेरिका हाँगकाँगचे स्वातंत्र्य संपुष्टात आणणाऱ्या लोकांना ओळखून त्यांना याकामासाठी जबाबदार ठरविण्याचे काम करेल, असे म्हणत चीनला धारेवर धरले आहे.

वाचा : २६/११ हल्ल्यात सहभागाची पाकची कबुली

हाँगकाँगमध्ये चीनकडून राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याच्या भूमिकेला विरोध करण्यात आला आहे. कारण हा कायदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय विरोधकांना दडपणारा असल्याचं अमेरिका मानतो. हा कायदा जूनमध्ये मंजूर करण्यात आला होता.

वाचा : बायडेन चमूकडे सूत्रे देण्यास ट्रम्प यांचा नकार

Back to top button