राहुल गांधींना 'तो' शब्द वापरल्याने बराक ओबामा माफी मागा ट्रेंडवर! | पुढारी

राहुल गांधींना 'तो' शब्द वापरल्याने बराक ओबामा माफी मागा ट्रेंडवर!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे राहुल गांधींविषयीचे मत सार्वजनिक झाल्यानंतर सोशल मीडियावर ट्रेंड सुरु  झाला आहे. भाजप आयटी सेलकडून राहुल गांधी यांना सातत्याने टार्गेट केले जाते. आता त्यांना बराक ओबामांच्या वक्तव्याने आयते कोलित मिळाले आहे. 

राहुल यांना ‘चिंताग्रस्त’ असे वर्णन करताना ओबामा यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, तो असा विद्यार्थी आहे ज्याने गृहपाठ केला आहे. आणि आपल्या शिक्षकावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात, त्या विषयात प्रभुत्व मिळवण्याची क्षमता किंवा उत्कटता नाही. न्यूयॉर्क टाईम्सने ओबामांच्या ‘अ प्रॉमिसिड लँड’ च्या आत्मचरित्राची  समीक्षा केली आहे. यामध्ये माजी राष्ट्रपतींनी जगभरातील राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही भाष्य केले आहे. 

यानंतर ओबामा आणि राहुल ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरवात झाली आहे. त्याचबरोबर #माफ़ी_माँग_ओबामा देखील ट्रेंडवर आहे. लोक त्यांच्या टिप्पण्यांसह मिम्स देखील शेअर करत आहेत. ओबामा यांची टिप्पणी सार्वजनिक होताच ट्विटरवर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. एकीकडे जे काँग्रेसकडे झुकले आहेत ते राहुल गांधींची बाजू मांडत आहेत.  तथापि त्यांचीही  लोक मजा घेत आहेत. 

Back to top button