विस्तारवादी चीनसमोर सैन्यभरतीची समस्या | पुढारी | पुढारी

विस्तारवादी चीनसमोर सैन्यभरतीची समस्या | पुढारी

बीजिंग : वृत्तसंस्था

निवृत्तीनंतर पुरेशा सोयी-सुविधा मिळत नसल्यामुळे चीनमध्ये तरुणांनी सैन्यभरतीकडे पाठ फिरविली आहे. विस्तारवादी धोरणामुळे आधीच अडचणीत आलेल्या चीनसमोर आता सैन्यभरतीची समस्या नव्याने निर्माण झाली आहे.

भारत आणि शेजारच्या देशांच्या भूभागांवर अतिक्रमण करणार्‍या चीनसमोरील अडचणी संपता संपेना झाल्या आहेत. निवृत्तीनंतरही सुविधा मिळत नसल्याने 5 कोटी 70 लाख माजी सैनिकांमध्ये चीन सरकारविरोधात असंतोष खदखदत आहे. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी उच्चशिक्षित तरुणांना आकर्षित करण्यास अपयशी ठरत आहे. या युवकांकडे सैन्यभरतीपेक्षा अधिक चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. वुहान विद्यापीठातील राजकीय अभ्यासक प्रा. क्नि किआनहोंग यांनी सांगितले की, युवकांसाठी चिनी लष्कर हे त्यांच्या करिअरसाठी चांगला पर्याय आहे, हे त्यांना पटवून द्यावे लागणार आहे. चीनला आजी-माजी सैनिकांना पुरेशा सोयी-सुविधा, सवलती द्याव्या लागणार आहेत.दरम्यान, माजी सैनिकांमधील हा असंतोष कमी करण्यासाठी चीन सरकारने एका विधेयकाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार माजी सैनिकांना आता नोकरीच्या इतर संधी, भत्ते, नोकरी, प्रशिक्षण आदी सुविधा देण्यात येणार आहेत.

Back to top button