ट्रम्प यांच्या संपत्तीत 100 कोटी डॉलर्सची घट | पुढारी

ट्रम्प यांच्या संपत्तीत 100 कोटी डॉलर्सची घट

वॉशिंग्टन :

कोरोना महामारीनेे झालेल्या नुकसानाीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत 100 कोटी डॉलर्सची घट झाली आहे. विविध 500 उद्योगांमध्ये ट्रम्प कुटुंबीयांचा सहभाग आहे. हॉटेल्स, रिसॉर्ट्स कोट्यवधी डॉलरचे गोल्फ क्‍लब आहे; पण महामारी काळात ट्रम्प यांच्या कंपन्यांना लाखो डॉलर्सचेे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत 100 कोटी डॉलर्सने कमी झाली आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्षांवर क्रिमिनल खटले चालवले जाऊ शकत नाहीत. मात्र, व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर अनेक गुन्हेगारी खटले चालविले जाऊ शकतात. कर्ज, करात नफा, लाच दिल्याचे आरोपही त्यांच्यावर आहेत. 

Back to top button