बॅरो शहरात सूर्य उगवेल पुढच्या वर्षीच | पुढारी

बॅरो शहरात सूर्य उगवेल पुढच्या वर्षीच

उतकियाग्विक : वृत्तसंस्था

अमेरिकेतील अलास्का प्रांत निसर्गरम्य आहे. या प्रांतातील बॅरो शहरात 18 नोव्हेंबर रोजी अखेरचे सूर्यदर्शन झाले होते. आता इथे 23 जानेवारीलाच सूर्य उगवेल. बॅरोचे नाव 2016 नंतर उतकियाग्विक असे बदललेले असले तरी हा बदल अजून जिभेवर रुळलेला नाही. म्हणजे 18 तारखेनंतर तब्बल 65 दिवस इथे लोक अंधारातच राहतील.  अंधाराचे 65 दिवस म्हणूनच हे दिवसही इथे ओळखले जातात. या शहराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे उन्हाळ्याच्या दिवसांत 2 महिन्यांपर्यंत सूर्य मावळतच नाही.    

दिवस-रात्र कसे होतात?

पृथ्वी स्वत:भोवती 24 तासांत एक चक्‍कर पूर्ण करते. पृथ्वी गोल आहे आणि ती स्वत:भोवती फिरताना सूर्याभोवतीही फिरते. एक भाग 12 तास सूर्यासमोर असतो तेथे दिवस असतो आणि ज्या भागावर सूर्यकिरणे पोहोचत नाहीत तेथे रात्र असते. पृथ्वीला सूर्याभोवती एक चक्‍कर पूर्ण करायला 365 दिवस, 6 तास आणि 48 मिनिटे लागतात. म्हणून 365 दिवसांनी आमचे वर्षही बदलते.

पृथ्वी आपल्या अक्षावर (अ‍ॅक्सिस) 23.5 अंश कललेली असते. पृथ्वी गोल आहे; पण थोडी कललेली म्हणजे तिरपीही आहे. पृथ्वीचे दोन ध्रुव आहेत. उत्तर आणि दक्षिण. पृथ्वी कललेली असल्याने जेव्हा ती सूर्याभोवती फिरत असते तेव्हा एकाच ध्रुवावर सूर्यकिरणे पडतात. सहा महिन्यांनी मग दुसर्‍या ध्रुवाची वेळ येते. म्हणून या दोन्ही ध्रुवांवर सहा महिने सलग दिवस आणि सहा महिने सलग रात्र असते. 

65 दिवसांची रात्र का?

बॅरो शहर उत्तर ध्रुवापासून 2 हजार 92 कि.मी. अंतरावर आहे. उत्तर ध्रुवावर आर्क्टिक सर्कल असते तर दक्षिण ध्रुवावर अंटार्क्टिका सर्कल… बॅरो शहर आर्क्टिक सर्कलच्या उंचावर आहे. त्यामुळे सूर्य इथे क्षितिजाच्या वर येऊ शकत नाही. 

जे शहर किंवा जो देश उत्तर ध्रुवाच्या जितक्या जवळ असेल तेथे तितक्याच प्रमाणात प्रदीर्घ दिवस आणि तितक्याच प्रमाणात प्रदीर्घ रात्र असेल. म्हणजे अजिबातच अंधार असेल का तर असेही नाही. सूर्य उगवेल; पण त्याचा उजेड नेमकेपणाने पोहोचणार नाही. या मौसमाला इथे ‘पोलर नाईटस्’ही म्हणतात. 

मौसमाच्या सुरुवातीला दिवसातले 6 तास आपल्याकडे भल्या पहाटे दिसते तसे दिसते; पण पोलर नाईटस् जसजशा पुढे सरकतात तसतसे हे दिसणे कमी होत जाते आणि तीन तासांवर कमी कमी होत 3 तासांवर येऊन ठेपते.

बॅरोत उन्हाळ्यात 12 मे ते 2 ऑगस्ट 82 दिवस सलग उजेड असतो. या काळाला ‘मिडनाईट सन’ म्हणतात. 

सूर्य मावळतो जरूर; पण त्याच्या उजेडाचे परावर्तन सुरूच असते. उन्हाळ्यात त्यामुळेच येथे सलग 24 तास उजेड असतो.

Back to top button