ट्रम्प यांनी पहिल्यांदाच बायडेन यांचा 'विजय' केला मान्य  | पुढारी

ट्रम्प यांनी पहिल्यांदाच बायडेन यांचा 'विजय' केला मान्य 

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या पहिल्यांदाच  प्रेसिडेंट इलेक्ट जो बायडेन जिंकल्याचे कबूल केले. त्यांनी आपल्या एका तासापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी तथ्यहीन आरोप केले पण, त्यांनी जो बायडेन यांचा विजय मान्य केला. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ते जिंकले कारण त्यांनी ही निवडणूक पळवली आहे. कोणतेही वोट वॉचर किंवा पर्यवेक्षकाला परवानगी देण्यात आली नाही. कट्टर डाव्या विचारांच्या खासगी कंपन्यांच्या मालकांनी मतांमध्ये छेडछाड केली आहे. ज्या निवडणूक उपकरणांच्या गुणवत्तेबाबत साशंकता आहे जी टेक्सासने ( जेथे मी भरपूर मतांनी जिंकलो )  पात्रही ठरवली नाहीत. याचबरोबर फेक आणि गप्प बसणारी माध्यम आणि बऱ्याच कारणांमुळे ते जिंकले.’ असे ट्विट केले आहे. 

बायडेन यांनी २७० पेक्षा जास्त इलेक्ट्रोल कॉलेज मतं मिळवली आहे. याचबरोबर त्यांनी चार दिवस तणावपूर्ण वातावरणात झालेल्या मतमोजणीनंतर शनिवारी पेन्सिल्‍व्हानिया जिंकले. कोरोनामुळे पोस्टल बॅलेटने मतदान झाले. त्याची मोजणी करण्यास बराच वेळ गेला. 

Back to top button