अन् इवांकांना मुलांना शाळेतून बाहेर काढावं लागलं  | पुढारी

अन् इवांकांना मुलांना शाळेतून बाहेर काढावं लागलं 

वॉशिंग्‍टन : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेत कोरोनाने हाहाकार उडवला असताना आता राष्‍ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांची कन्या इवांका ट्रंम्‍प यांना कोरोनाच्या मार्गदर्शक तत्‍वांचे पालन न केल्‍याने आपल्‍या मुलांना शाळेतून काढायची वेळ आली आहे. इवांका ट्रम्‍प आणि त्‍यांचे पती जेरेड कुश्नर यांनी आपल्‍या तीन मुलांचे नाव वॉशिंग्‍टनच्या पॉश स्‍कूलमधून काढून त्‍यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्‍यावा लागला आहे. ही तीनही मुले गेल्‍या ३ वर्षांपासून या शाळेमध्ये शिकत होती. 

शाळा प्रबंधाने सांगितल्‍यानुसार इवांका ट्रम्‍प आणि त्‍यांचे पती जेरेड यांनी अनेक वेळा सार्वजनिकरित्‍या पालकांसाठी लागू केलेल्‍या कोरोनाच्या मार्गदर्शक तत्‍वांचे उल्‍लंघन केले. सीएनएनच्या वृत्‍तानुसार शाळेच्या पॅरेंट हँन्डबुकमध्ये लिहिलेल्‍या कोरोनापासून बचावाचे दिशानिर्देश पाळले नाहीत. मास्‍क वापरणे आणि सोशल डिस्‍टन्स पालनाच्या विनंतीनंतर इवांका ट्रम्‍प यांना आपल्‍या मुलांचा शाळेतून दाखला काढणे भाग पडले. 

अनेक पालकांनी शाळेकडे केली होती तक्रार…

इवांका आणि जेरेड हे कोरोनाबाबतच्या दिशानिर्देशांचे पालन करत नसल्‍याची तक्रार अनेक मुलांच्या पालकांनी शाळा प्रशासनाकडे केली होती. शाळा प्रशासनाला चिंता होती की, इवांका आणि जेरेड हे अशा वातावरणात काम करतात त्‍या ठिकाणी कोरोनाची प्रकरणे अधिक आहेत. त्‍या ठिकाणी कोणीही मास्‍कचा वापर करत नाही. 

पालकांनी इवांका यांच्याबद्दल तक्रार करताना म्‍हटले होते की, इवांका ट्रम्‍प यांनी पूर्ण कुटुंबियांसोबत वडिलांसोबत पहिल्‍या प्रेसिडेंशियल डिबेटमध्ये सहभाग घेतला होता. या दरम्यान त्‍यांनी चेहऱ्याला मास्‍क लावला नव्हता. सुप्रीम कोर्टाच्या घटनेत १३ लोक आजारी पडले होते. तसेच या घटनेनंतर इवांका आणि जेरेड यांना अलगीकरणातही ठेवले नव्हते. इतकच नाही तर, ट्रम्‍प आणि मेलानिया पॉझिटिव्ह असूनही इवांका यांनी स्‍वत:ला क्‍वारंटाईन केल नव्हते. 

Back to top button