डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता त्यांच्या वकिलाने केलेल्या कृतीने सगळेच हैराण! (video)  | पुढारी

डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता त्यांच्या वकिलाने केलेल्या कृतीने सगळेच हैराण! (video) 

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वकील रुडी जियुलियानी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पत्रकार परिषदेत रुडी ज्युलियानी यांचे हेअर डाय निघाला होता. आता लाजिरवाणा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  त्यांनी रुमालाने आपले नाक पुसले आणि मग चेहरा पुसण्यासाठी तसाच फिरवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेतील अनेक कायदेशीर सल्लागारांसह रुडी जियुलियानी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोटाळ्याचा आरोप केला.


पत्रकार परिषद दरम्यान जेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदार फसवणूकीचा आरोप केला तेव्हा त्यांच्या केसांपासून डाय बाहेर येत होता. जिथे पत्रकार परिषद सुरु होती तिथ खूप गर्मी होती. त्यांना घाम फुटला होता. त्यामुळे घामाबरोबर  त्यांचा डायचा रंगही बाहेर येऊ लागला. इंटरनेटने ते पकडले गेले आणि त्यांची थट्टा करण्यास सुरुवात केली.

ही एकमेव घटना नव्हती. रुडी जियुलियानी यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्याने सोशल मीडियावर धमाल केली आहे. व्हिडिओमध्ये रुडी यांनी रुमाल बाहेर काढून नाक शिंकरताना दिसून येत आहेत. मग रुमालाने चेहरा पुसण्यास सुरूवात करतात. 

Back to top button