लाखोंचे आयफोन घेऊन डिलिव्हरी बॉय फरार | पुढारी

लाखोंचे आयफोन घेऊन डिलिव्हरी बॉय फरार

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

सर्वांत महागडा iPhone 12 Pro Max कोणाला खरेदी करायला आवडणार नाही. ॲपलकडून २०२० मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या iPhone 12 लाईनअपचा सर्वात पॉवरफुल डिव्हाईस आहे. चीनमध्ये या सर्वांत महागड्या मोबाईलची खूप मागणी होती. डिलिव्हरी बॉयने या आयफोन मोबाईलची विक्री केली नाहीच. परंतु, पुढे काय झालं, हे वाचाच. 

कॅलिफोर्निया प्रीमियम टेक ब्रँड ॲपलकडून लॉन्च करण्यात आलेल्या आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल iPhone 12 Pro Max मार्केटमध्ये आला आहे. या डिव्हाईसची विक्री सुरू आहे आणि हेवी प्राईस टॅग असतानाही याची खूप मागणी आहे. ॲपलचे आयफोन महाग असतात. ही गोष्ट कुणापासून लपलेली नाही आणि त्यामुळेच iPhone 12 Pro Max डिलिव्हरी करण्याऐवजीच स्वत: डिलिव्हरी बॉयच सर्व युनिट्स घेऊन पळून गेला. 

चीनमध्ये एका शिपमेंट कंपनीमध्ये काम करणाऱ्या तांगला ॲपलच्या ऑथराईज्ड स्टोरमधून १४ नवे iPhone 12 Pro Max युनिट दुसरे ॲपल स्टोरपर्यंत पोहोचवायचं होतं. तांगने सर्वच्या सर्व डिव्हाईसेज स्वत: घेऊन पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि नंतर ऑर्डर कॅन्सल करण्यात आलं. ऑर्डर १४ नोव्हेंबरला द्यायची होती आणि तांगने हे मोबाईल्य गुइयांग ॲपल स्टोरहून  कलेक्ट केले. ऑर्डर दुसऱ्या स्टोरर्पंत घेऊन जाताना तांग सर्व मोबाईल घेऊन पळून गेला. 

कमी किमतीवर विकले ३ आयफोन

जेव्हा ॲपलला ही माहिती समजली तेव्हा तांगला पकडण्यात आले. त्याच्याजवळ १० बंद iPhone 12 Pro Max बॉक्स मिळाले आणि बाकी चार डिवाईस त्याने ओपन केले होते. एक डिव्हाईस आपल्या पर्सनल युजसाठी ओपन केल्यानंतर डिलिव्हरी बॉयने अन्य तीन iPhone 12 Pro Max खूपच कमी किमतीत विकले होते. नंतर पोलिसांनी चार डिव्हईसदेखील ताब्यात घेतले  आहेत. 

तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा 

कधाही डिलिव्हरी बॉयकडून ऑर्डर कॅन्सल झाल्यानंतर आपल्या अकाऊंटमध्ये ऑर्डरचे स्टेटस चेक करा. जर डिलिव्हरी बॉय तुम्हाला बोलण्यात गुंतवत असेल तर शॉपिंग साईटच्या कस्टमर केअरवर कॉल करून गोष्टी पडताळून पाहा. प्रोडक्टचे पॅकेजिंग ठिक नलेल तर आपण ते रिसीव्ह करण्यास नकार देऊ शकतो. त्याशिवाय, महाग प्रोडक्टची ओपन-बॉक्स-डिलिव्हरीची मागणीदेखील आपण करू शकता. अनबॉक्सिंग डिलिव्हरी बॉयच्या समोर आपण त्या महाग प्रोडक्ट्सचे व्हिडिओदेखील रेकॉर्ड करू शकता. 

Back to top button