श्रीलंकेतील तुरुंगात उसळली दंगल; ८ कैद्यांचा मृत्यू | पुढारी

श्रीलंकेतील तुरुंगात उसळली दंगल; ८ कैद्यांचा मृत्यू

कोलंबो : पुढारी ऑनलाईन

श्रीलंकेतील कोलंबो पासून जवळ असलेल्या तुरुंगात उसळलेल्या दंगलीत ८ कैद्यांचा मृत्यू झाला आहे, तर ३७ जण जखमी झाले आहेत. ही घटना कोलंबो पासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या महारा तुरुंगात घडली आहे.

वाचा : ‘सत्‍य-असत्‍याच्या लढाईत तुम्‍ही कुणासोबत, शेतकरी बांधवांसोबत की पंतप्रधानांच्या अब्जाधीश मित्रांसोबत?’

कैद्यांनी तुरुगांचा दरवाजा उघडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तुरुंग प्रशासनाने बळाचा वापर केला. यामुळे कैदी आणि तुरुंगातील सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. यात ८ कैद्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

वाचा : जीवनाचं ध्येय शोधण्यासाठी ‘आनंदवन’मध्ये रमल्या शीतल आमटे

ज्यावेळी रिमांडवरील कैद्यांनी दरवाजा उघडून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कैद्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर करावा लागला, अशी माहिती पोलिस प्रवक्ते अजित रोहाना यांनी दिली आहे.

कैद्यांनी तुरुंगातील स्वयंपाकघराला आणि रेकॉर्ड रुमला आग लावली. यादरम्यान उडालेल्या दंगलीत ३७ जण जखमी झाले. यात कैद्यांसह दोन जेलरचा समावेश आहे. जखमींना जवळच्या रगामा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाचा : इंडियन कोस्ट गार्डमध्ये भरती; दहावी पासवाल्यांना थेट ५० हजार पगाराची संधी! 

श्रीलंकेतील तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. येथील १७५  कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हल्लीच कैद्यांनी तुरुंगात निदर्शने करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. 

वाचा लष्कर आणि रॉ प्रमुख नेपाळमध्ये, अजित डोभाल श्रीलंकेत! रणनीती आहे तरी काय?

श्रीलंकेतील विविध तुरुंगात कैदी ठेवण्याची क्षमता १० हजार असताना त्या ठिकाणी २६ हजारांपेक्षा कैद्यांना ठेवण्यात आले आहे. यामुळे तुरुंगात कोरोनाचा उद्रेक झाला आहे.   

 

Back to top button