पतीच्या स्वप्नामुळे पत्नीला लागला तब्बल ३४० कोटी रुपयांचा जॅकपॉट! | पुढारी

पतीच्या स्वप्नामुळे पत्नीला लागला तब्बल ३४० कोटी रुपयांचा जॅकपॉट!

टोरांटो ( कॅनडा ) : पुढारी ऑनलाईन

‘मनी’ वसे ते स्वप्नी दिसे अशी मराठीत म्हण आहे. पण, ही म्हण खऱ्या ‘अर्था’ने सत्यात आणली ती कॅनडातील डेनग प्राव्हाटौडोम या ५७ वर्षाच्या महिलेने. मात्र यात स्वप्न दिसले ते डेनगच्या पतीला आणि ‘मनी’ मिळाला तो डेनगला. (Woman wins 340-cr lottery in Canada says Got winning numbers from husband’s dream)

डेनगने कॅनडातील ३४० कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. डेनगने लॉटरी जिंकल्यानंतर सांगितले की, त्यांच्या पतीला लॉटरीच्या आकड्याबाबत स्वप्न पडले होते. डेनग याच आकड्यांच्या आधारे गेली दोन दशते लॉटरी लावत होती. अखेर दोन दशकानंतर २०२० वर्ष सरत असताना तिच्यावर लक्ष्मी प्रसन्न झाली. लॉटरी जिंकल्यानंतर डेनगने प्रतिक्रिया देताना सांगितले की जिंकलेल्या पैशातून ती एक घर घेणार आहे आणि कोरोनाची महामारी संपल्यानंतर परवानगी मिळाली की ती जग फिरणार आहे.

आण्णांनी घातलेल्या टोप्यांचं पुढं काय झालं?

डेनग ही दोन मोठ्या मुलांची आई आहे. तिला दोन नातवंडेही आहेत. ती आपल्या १४ भावंडांसह कॅनडात १९८० मध्ये विस्थापित म्हणून आली होती. तिने सांगितले की, ‘माझ्या कुटुंबाला एक स्थानिक चर्च पैशाची मदत करत होते कारण आमच्याकडे काहीच नव्हते. त्यामुळे मी त्यांची आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आभारी आहे. माझे पती हे गेल्या ४० वर्षापासून जनरल लेबरर्स म्हणून काम करत होते. त्यातून आम्ही कुटुंबासाठी बचत करत होतो. पण, कोरोना महामारीमुळे आमच्याजवळचे पैसे संपत आले होते. त्यामुळे आता मिळालेल्या या रक्कमेमुळे आमचे आयुष्य सुकर होण्यास मदत होणार आहे.’

अमित शहांकडून ममता दिदींना राजकीय धक्के सुरुच; तृणमूल काँग्रेसचे पाच नेते भाजपच्या गळाला!

डेनग ही लॉटरी काढणारी नेहमीची ग्राहक आहे. ती गेल्या २० वर्षापासून एकाच आकड्याची लॉटरी घेत असे. हा आकडा एका रात्री तिच्या पतीच्या स्वप्नात आला होता. लॉटरी जिंकल्यानंतर डेनगने सांगितले की, ‘मी माझी प्रार्थना झाल्यानंतर जवळच्या मॉलमध्ये लोट्टो मॅक्स तिकीटाचे काय झाले हे पाहण्यासाठी गेले. त्यावेळी मी फ्री प्ले तिकीट जिंकले आणि  विजेता म्हणून माझे नाव जाहीर झाले. मला पुढचे अनेक दिवस मी काढलेल्या तिकीटावर ३४० कोटी रुपये जिंकल्याचा विश्वास बसत नव्हता.’

Back to top button