मध्य मेक्सिकोत भलामोठा खड्डा पडल्याने संपूर्ण जगाच्या भूवया उंचावल्या! (photos) | पुढारी

मध्य मेक्सिकोत भलामोठा खड्डा पडल्याने संपूर्ण जगाच्या भूवया उंचावल्या! (photos)

मेक्सिको; पुढारी ऑनलाईन : मेक्सिकोच्या पुएब्ला राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुएब्ला राज्यात एक जागा आहे सांता मारिया झॅकटेपेक. या गावात शेतकरी शेती करून पोट भरतात. त्यादरम्यान, त्यांच्या शेतात एक प्रचंड मोठा खड्डा तयार झाला आहे. खड्डा सुमारे ३०० फूट खोल आणि तो ७० हजार चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेला आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार पहिल्यांदा  हा खड्डा १५ फुटांचा होता, पण नंतर झपाट्याने वाढत गेला. 

अधिक वाचा : चीनच्या वुहानमधूनच आला कोरोना : डोनाल्ड ट्रम्प

हा खड्डा गेल्या शनिवारी प्रथमच दिसला. पुएब्ला राज्याचे गव्हर्नर मिगुएल बार्बोसा हुयर्टा म्हणाले की, सांता मारिया झॅकटेपेक शहरात असलेले खड्डा २० मीटर खोल आहे. हा खड्डा सातत्याने वाढत असल्याने जवळपासची घरेदेखील धोक्यात आली आहेत. अधिकृत माहितीनुसार, खड्ड्याजवळ राहणारे कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आलं आहे. लोकांना या खड्ड्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आतापर्यंत यामुळे कुणालाही इजा झाली नाही.

अधिक वाचा : ‘या’ ५ सेक्सी घटनांमुळे जगाच्या इतिहासच बदलला!

मेक्सिको रीजनचे पर्यावरण सचिव बिएट्रीज मॅन्रिक यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा हा खड्डा पहिल्यांदा तयार झाला तेव्हा त्याची त्रिज्या केवळ १५ फूट होती, परंतु काही तासांतच ती झपाट्याने पसरू लागली. जमीन भूसभुसीत असल्याने असे होत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय जल आयोगासह सार्वजनिक संस्थाचे अधिकारी मातीचे नमुने संकलित करून तपासणी करणार आहेत. 

अधिक वाचा : तर चीन, जपानमध्ये कोरोना हाहाकार माजवणार!

जरी या कामासाठी ३० दिवसांचा कालावधी लागणार असला, तरी हा खड्डा सतत वाढत आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, खड्ड्याच्या शेजारी राहणा-या एका व्यक्तीने सांगितले की तो वादळाच्या आवाजासाठी जेव्हा पहाटे उठला तेव्हा त्याने हा खड्डा पाहिला. त्यामध्ये पाण्याचे फुगे दिसत होते. त्यांना खूप भीती वाटली. त्यांचे घरही खड्ड्यात आले आहे याची त्यांनाही खंत आहे.

अधिक वाचा : ‘कंडोम’च्या विचित्र इतिहासाबद्दल तुम्हाला माहितीय का?

Back to top button