‘एलियन्स असल्याचा ठोस पुरावा नाही’ | पुढारी

'एलियन्स असल्याचा ठोस पुरावा नाही'

पुढारी ऑनालईन डेस्क; परग्रहावर असणाऱ्या ‘एलियन्स’च्या असित्वासंदर्भात ठोस निष्कर्ष काढणारा एक अहवाल अमेरिकेच्या गुप्ततर विभागाने नुकताच प्रकाशित केला आहे. अमेरिकेचं लष्कर आणि गुप्तचर विभागाने हे स्पष्ट केलं आहे की, एलियन्स असणारे यान अवकाशात फिरत होते, याबद्दल कोणताही पुरावा मिळालेला नाही. ही माहिती न्यूयाॅर्क टाईम्ससहीत अन्‍य माध्यमांनी दिली आहे. 

अमेरिकेच्या लष्कराने आणि गुप्तचर विभागाने एलियन्सचे किंवा त्यांचे अवकाशात फिरणारे अज्ञात यान यांचं अस्‍तित्‍व नाकारलं असलं तरी, त्याबद्दल योग्य विश्लेषण करू शकलेलं नाही. त्याचबरोबर वैमानिकांकडून अज्ञात यानाचे किंवा पॅंटागाॅनचा व्हिडीओ जे चित्रीकरण करण्यात आलेले होते, त्यावरून एलियन्सचे अस्तित्वही त्यांना नाकारता आलेलं नाही. 

न्यूयाॅर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, प्रशासकीय सूत्राकडून सांगण्यात आले आहे की, मागील २० वर्षांमध्ये १२० पेक्षा जास्त अशाप्रकारच्या अज्ञात घटना घडल्या आहेत. मात्र, आतापर्यंत अशा अज्ञात घटनांशी अमेरिकेच्या लष्कराचा किंवा सरकरी तंत्रज्ञानाचा संबंध आलेला नव्हता किंवा त्यावर संशोधनही करण्यात आलेलं नव्हतं. अमेरिकेच्या नौदलातील वैमानिकांकडून हायपरसॅनिक वेगाने प्रवास करताना जे अज्ञान यान अवकाशात फिरत असताना जो व्हिडीओ रेकाॅर्ड केलेला होता, त्यावर कोणतेच स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर समस्या

अमेरिकच्या संरक्षणच्या दृष्टीने अज्ञात यानाचे अवकाशातील मार्गक्रमण ही एक मोठी आणि गंभीर समस्या झालेली आहे. या समस्येच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे शूत्र असणाऱ्या रशिया आणि चीनकडून अमेरिकेवर पाळत ठेवण्यासाठी अत्यंत प्रगत असं तंत्रज्ञानही वापरलं जात आहे. त्यामुळे अज्ञात एलियन्स किंवा एलियन्सचे यान, ही बाब षड्यंत्रही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

मागील वर्षी देण्यात आलेल्या आदेशानुसार, अज्ञात यान किंवा एलियन्स संदर्भात जो अहवाल तयार करण्यात आलेला आहे. तो अहवाल अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या संचालकांकडून जून अखेरपर्यंत काॅंग्रेससमोर सादर करायचा आहे. मुख्य अहवालात मात्र, वर्गीकरण न करता जनतेसमोर ठेवण्यात येईल. पण, त्याच्या परिशिष्टामध्ये वर्गीकरण देण्यात येणार आहे. पण, ते गुप्तच राहणार असल्‍याचेही न्यूयाॅर्क टाईम्सने म्‍हटलं आहे. या अहवालासंदर्भात वाॅशिंग्टन पोस्ट असं सांगितलं आहे की, अज्ञात यान किंवा एलियन्ससंदर्भात ठोस निष्कर्ष देण्यात आले नसतीलही; पण शक्यता नाकारता नाही. 

मागील वर्षी पॅंटागाॅनसंदर्भात जो व्हिडीओ बाहेर आला, त्यावेळी परग्रहावरील अज्ञात लोकांच्या जीवनाबद्दल खूप जणांमध्ये जिज्ञासा निर्माण झाली होती. अवकाशात वेगात उडणाऱ्या अज्ञात वस्तूसंदर्भात नौदलातील वैमानिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यावेळी या वैमानिकांची मुलाखतही घेण्यात आलेल्या होत्या. तत्कालिन अध्यक्ष बराक ओबामा, गुप्तचर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिलेल्या होत्या. 

कोण काय म्हणालं होतं…

मे २०१७ मध्ये एका मुलाखतीत बराक ओबामा म्हणाले होते की, “या विषयाबद्दल मी खूपच गंभीर होतो. अवकाशातील अज्ञात यानाचं जे रेकाॅर्ड करण्यात आलेलं ते पाहून नेमकं काय आहे, माहीत नव्हतं”, असं भाष्य ओबामा यांनी केले होतं. तर, अमेरिकेचे गुप्ततर विभागाचे संचालक जाॅन रॅटक्लिफ यांनी फाॅक्स न्यूजशी बोलताना म्हणाले होते की, “अशा बऱ्याच गोष्टी पाहण्यात आलेल्या होत्या. त्या सार्वजनिक करता येत नाहीत. अशी काही उदाहरणं असतात, त्याचं योग्य स्पष्टीकरण आपल्याला करत नाहीत”, असं रॅटक्लिफन यांनी सांगितलं होतं. 

पॅंटागाॅनच्या युपीए इनव्हेस्टिगेशनमध्ये काम करणारे लुईस एलिझोंडो म्हणाले की, “मानवाला माहीत नसणारी उच्च प्रतिचे अद्ययावत तंत्रज्ञान या अज्ञात यानाबद्दल वापरण्यात आलेले आहे.” एलिझोंडो यांनी शुक्रवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, “जर न्यूयाॅर्क टाईम्सने दिलेली माहिती अचूक असेल, तर वैमानिकांद्वारे पाहण्यात आलेल्या आणि अवकाशात फिरत असणाऱ्या यानाची जी प्रतिकृती दिसली त्यामध्ये वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान हे आपण वापरत असलेल्या तंत्रज्ञानापेक्षा कित्येक पटीने प्रगत आहे”, असेही एलिझोंडो यांनी स्‍पष्‍ट केले आहे. 

Back to top button