चीनमध्ये २८ तास ४५ मिनिटांत १० मजली इमारत तयार   | पुढारी

चीनमध्ये २८ तास ४५ मिनिटांत १० मजली इमारत तयार  

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीन नेहमी नवनव्या तंत्रज्ञानासाठी जगभरात चर्चेत असतो. असेच नव तंत्रज्ञानाचा वापर  करून चीन पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यावर तुमचा सुध्दा विश्वास बसणार नाही. चीनने २८ तास ४५ मिनीटांत १० मजली इमारत उभी केली आहे.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला आहे. 

चीनमधील इमारत बांधणाऱ्या ब्रॉड ग्रुपने अवघ्या एका दिवसात स्टीलच्या अपार्टमेंटची इमारत उभी करण्यात यशस्वी झाला आहे. या इमारतीला त्यांनी बोल्टेड आणि मॉड्यूलर युनिट्स वापरली आहेत. या युनिटला ‘लिव्हिंग बिल्डिंग सिस्टम’ म्हणून ओळखले जाते.

२८ तास ४५ मिनीटांत चीनच्या चांग्शा शहरात तयार झाली इमारत 

 चीनमधील चांग्शा शहरात ही इमारत बांधण्याचा विक्रम केला आहे. चांग्शामध्ये २८ तास ४५ मिनिटांत १० मजली आलिशान इमारत बांधली आहे. एवढ्या कमी वेळात ही इमारत बनवणाऱ्या कंपनीने १३ जून रोजी ५ मिनिटांचा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे. या व्हिडिओत इमारतीचा पाया घालण्यापासून ते पूर्ण होण्यापर्यंत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

अशी तयार केली इमारत 

प्री फॅब्रीकेटेड कन्स्ट्रक्शन सिस्टम तंत्रज्ञानाचा वापर करुन ब्रॉड ग्रुपने २८ तास ४५ मिनिटांत १० मजली इमारत तयार केली आहे. या ब्रॉड ग्रुपने या इमारत निर्मितीचा टाईम लेप्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. इतक्या कमी वेळात इमारत कशी तयार केली. यात तयार कंटेनरचे तंत्रज्ञान आहे. लहान पध्दतीचे इमारतीचे युनिट्स तयार असतात. ऑनसाईट इनस्टॉलेशनच्‍या माध्‍यमातून सर्व युनिट्स एकत्रित करुन इमारत उभी केली जाते. हे युनिट्स कारखान्यात बनवले जातात.  

कारखान्यात तयार होतात ही घरं

एका अहवालानूसार, प्री फॅब्रिकेटेड इमारती लगेच एकत्रीत करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. मोठ्या कंटेनरसारखे दिसणारे इमारत मॉडेल्स पहिल्यांदा ब्रॉड ग्रुपच्या कारखान्यात तयार केले जातात. आणि ट्रकमधून इमारत उभा करायची ठिकाणी पोहचवली जाते, आवश्यकतेनुसार एकत्र केले जातात. मग ते बोल्टने फिट्ट केले जातात असे करून एक इमारत बनविली जाते. ही इमारत तयार झाल्यानंतर यात वीज आणि पाण्याचे कनेक्शनही जोडले आहेत. 

भुकंपाचाही परिणाम या घरांवर होत नाही

एका अहवालानुसार, यात वापरलेले स्टिल हे स्लॅबपेक्षा १० पटीने मजबूत आहेत. हे भूकंप प्रतिरोधक असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

वाचा : डायनासोरकालीन सिलॅकांथ मासे शतायुषी; गर्भधारणा काळ ५ वर्षे

वाचा : नेपाळने कोरोना लसीची किंमत जाहीर केली; चीनची तीळपापड

Back to top button