पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून ज्यांच्या उल्लेख होतो, त्या एलाॅन मस्क यांनी नुकतीच ट्विटर विकत घेतली. मस्क यांच्या टेस्ला, स्पेस एक्स, हायपरलूप, ओपनआय, न्यूरालिंक, द बोरिंग कंपनी, जिप-२, आणि पे-पल, अशा ८ कंपन्यांच्या यादीत आता ट्विटरची भर पडली आहे. नुकत्याच प्रकाशित केलेल्या फोर्ब्जच्या यादीनुसार जगातील पहिल्या ५ श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानी असणारे एलाॅन मस्क यांच्या जीवनाबद्दल अधिक जाणून घेऊ या…
एलाॅन मस्कचे प्रारंभीचे जीवन
दक्षिण आफ्रिकेत वैमानिक, इलेक्ट्रिक इंजिनियर आणि उत्कृष्ट नाविक असणारे एराॅल मस्क आणि मैय मस्क या दाम्पत्यांच्या पोटी २८ जून १९७१ साली एलाॅन मस्क यांचा जन्म झाला. १० वर्षांचा असताना त्यांच्या आई-वडिलांमध्ये घटस्फोट झाला. त्यांनतर एलाॅन आपल्या वडिलांसोबत प्रिटोरियामध्ये राहिले. मस्क यांचा कम्प्यूटर हा आवडीचा विषय होता. त्यांनी १२ व्या वर्षी 'ब्लास्ट' नावाची व्हिडिओ गेम तयार केली आणि कम्प्यूटर मॅगेजिन या अमेरिकन कंपनीला ५०० डाॅलर्सला विकली. १९८८ मध्ये कॅनडाचा पासपोर्ट मिळाल्यानंतर मस्क यांनी प्रस्थान केले. नंतर कॅनडाच्या युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिलनेवियामध्ये BA आणि व्हाटर्न स्कूर ऑफ बिजनेसमधून इकोनाॅमिक्स विषयात BE पदवी प्राप्त केली.
Paypal आणि SpaceX नावाच्या कंपन्या
एलाॅन मस्क यांची x.com ही दुसरी कंपनी होती. १९९९ मध्ये ती तयार करण्यात आली होती. या कंपनीचे मुख्य काम पैशांची देवाण-घेवाण होते. दरम्यान, काॅन्फिनिटी नावाची दुसरी कंपनी आली. ती कंपनीदेखील हेच काम करत होती. नंतर या दोन कंपन्या वेगळ्या झाल्या. त्यानंतर x.com या कंपनीचे Paypal असे नाव ठेवण्यात आले.
एलाॅन मस्क यांनी SpaceX नावाची कंपनी तयार करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. ६ मे २००२ मध्ये Space Exploration Technologies Corporation या राॅकेटची निर्मिती केली. Space Exploration Technologies Corporation कंपनीचे शॉर्ट नाव म्हणजेच SpaceX आहे. पण, अंतराळात राॅकेट नेण्यासाठी मस्क यांनी खूप समस्या आल्या, त्यामुळे त्यांनी इतर कंपन्यांकडून मदत मागितली. पण त्यांनी मदत मिळाली नाही.
त्यांनी २००६ ते २००८ मध्ये ३ वेळा अंतराळात राॅकेट उडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश मिळाले नाही. २८ सप्टेंबर २००८ रोजी त्यांनी यश मिळाले. त्यांच्या या कार्याने प्रभावित होऊन 'नासा'ने अमेरिकन अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेतून उड्डाण घेण्यासाठी १.६ बिलियन मध्ये SpaceX या कंपनीशी करार केला.
टेस्ला (Tesla) कंपनीची निर्माती
एलाॅन मस्क यांच्या कंपनीचे नाव निकोला टेस्ला ठेवण्यात आले. कारण, निकोला टेस्ला हे कंपनीचे निर्माते आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. ज्यांनी १ जुलै २००३ मध्ये टेस्ला कंपनी लाॅन्च केलेली होती. एलाॅन मस्क यांनी २००४ मध्ये टेस्ला कंपनीमध्ये ७० मिलियनची गुंतवणूक केली. त्यानंतर मस्क यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी काम करण्यास सुरूवात केली. एलाॅन मस्क यांनी सांगितले आहे की, "या कंपनीचा उद्देश इलेक्ट्रिकल वाहनांची निर्मिती करणे आणि सौर ऊर्जेतून होणाऱ्या परिवर्तनाला मदत करणे हा आहे."
पहा व्हिडिओ : रात्रीच्या अंधारात जंगल काय सांगतं?
हे वाचलंत का?