लवकरच रशिया-युक्रेन युद्धबंदी | पुढारी

लवकरच रशिया-युक्रेन युद्धबंदी

कीव्ह ः

युद्धामुळे युक्रेनची अवस्था खूपच भयावह झाली आहे. रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडला आहे. काही शहरे तर बकाल झाली आहेत. नागरिकांना सामूहिकरित्या दफन केले जात आहे. रशियन सैनिकांकडून सामान्य युक्रेनी नागरिकांना लक्ष्य केले जात आहे.
सातत्याने होत असलेल्या बॉम्ब वर्षावामुळे युक्रेनच्या शहरांचा जगाशी संपर्क तुटला आहे. आपला जीव वाचण्यासाठी युक्रेनी नागरिकांनी ज्याठिकाणी आसरा घेतला आहे त्या ठिकाणीही रशियाने हल्ले केले आहेत. अशातच मारियुपोल शहरात अडकलेल्या एका कुटुंबाने आपला जीव वाचवण्यासाठी सुमारे 125 किलोमीटर पायी प्रवास करत झपोरिझिया गाठले आहे.

येव्हगेन आणि टेटियाना कोमिसारोव्हा या दाम्पत्याने आपल्या चार मुलांना वाचविण्यासाठी मारियुपोल सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. परिस्थितीला न घाबरता त्यांनी मारियुपोल सोडले आणि पायी प्रवास सुरू केला. मुलांची समजूत काढली. अखेर आम्ही इच्छाशक्तीच्या जोरावर झपोरिझिया गाठले, असे टेटियाना कोमिसारोव्हा हिने सांगितले.

 

Back to top button