श्रीलंकेतील आणीबाणी मागे, काेलंबाेमध्‍ये चीनविरोधात निदर्शने

कोलंबो : पुढारी ऑनलाईन
श्रीलंकेचे राष्‍ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी मंगळवारी रात्री देशावर लादलेली आणीबाणी मागे घेतली. देशातील आर्थिक स्‍थिती दयनीय झाल्‍याने नागरिकांनी सरकारविरोधात निदर्शने सुरु केली हाेती. परिस्‍थिती हाताबाहेर गेल्‍यानंतर १ एप्रिल राेजी राजपक्षे यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती.

विद्यार्थ्यांचा पंतप्रधान राजपक्षेंच्‍या निवासस्‍थानावर मोर्चा

आर्थिक रसातळाला गेलेल्‍या श्रीलंकेमधील सर्वसामान्‍य नागरिक महागाईत होरपळत आहे.  सरकारविराेधात सर्वसामान्‍य नागरिक तीव्र निषेध करत आहे. मंगळवारी हजारो विद्यार्थ्यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्‍या निवासस्‍थानावर मोर्चा काढला. राजपक्षे सरकारने चीनला सर्व काही विकले आहे. सरकार पूर्णपणे कंगाल झाले आहे, असा आरोप करत विद्यार्थ्यांनी श्रीलंका सरकारसह चीनविरोधातील तीव्र निदर्शने केली.

लष्‍करासह पोलिसांचा कठोर कारवाईचा इशारा

आर्थिक रसातळाला गेलेल्‍या श्रीलंकेमधील सर्वसामान्‍य नागरिक महागाईत होरपळत आहे. सरकारविरोधात रस्‍त्‍यावर उतरुन नागरिक तीव्र आंदोलन करीत आहेत. मंगळवारी आणीबाणीचा निर्णय मागे घेतल्‍यानंतर आंदोलनाच्‍या नावाखाली हिंसाचार करणार्‍या जमावावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा श्रीलंकेच्‍या लष्‍करासह पोलिसांनी दिला आहे.

हेही वाचा :

Exit mobile version