जगातील सर्वांत श्रीमंत मी नव्हे, व्लादिमीर पुतीन : अ‍ॅलन मस्क | पुढारी

जगातील सर्वांत श्रीमंत मी नव्हे, व्लादिमीर पुतीन : अ‍ॅलन मस्क

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था : टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅलन मस्क हे जागतिक यादीनुसार सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. पण, स्वत: मस्क असे मानत नाहीत. जगातील सर्वात श्रीमंत मी नव्हे, तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे आहेत, असे अ‍ॅलन मस्क यांनी ‘बिझनेस इनसाइडर’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

मस्कयांची एकूण संपत्ती 260 अब्ज डॉलर आहे. पतीन यांच्याकडे किती संपत्ती आहे, याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पुतीन यांना वर्षाला 1 लक्ष 40 हजार डॉलर वेतन मिळते. पुतीन यांचा 1.4 अब्ज डॉलरचा राजवाडा आहे.

4 अब्ज डॉलरचे मोनॅको अपार्टमेंट आहे. 700 आलिशान गाड्या आहेत, अशी जुजबी माहिती पुतीन यांच्या संपत्तीबद्दल उपलब्ध आहे. उपलब्ध नसलेली माहिती काढली तर पुतीन हेच जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्‍ती आहेत, असे मस्क यांनी स्पष्ट केले. पुतीन यांनी आता तरी युद्ध थांबवायला हवे, या आग्रहाचा या मुलाखतीतही पुनरुच्चार केला आहे.

Back to top button