मास्को/ वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन
रशिया-युक्रेन युद्धाचा आज २१ वा दिवस आहे. युक्रेनचे अतोनात नुकसान झाले आहे. रशियालाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. अमेरिकेसह युरोपीयन संघातील देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. अशातच रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल आयात करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ( India and Russia ) यासंदर्भात भारत कोणता निर्णय घेणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्चे तेल दराचा भडका उडला आहे. यामुळे भारतात महागाईचा भडका उडाला आहे. आता रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल आयात करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासंदर्भात भारत कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात व्हाईट हाउसचे माध्यम सचिव जेक सॉकी यांनी म्हटलं आहे की, " भारताने रशियाने सादर केलेला स्वस्त कच्चे तेल विक्रीचा प्रस्ताव स्वीकारल्यास प्रतिबंध नियमांचे उल्लंघन होणार नाही. मात्र अशा स्वरुपाचा करार हा भारत एका चुकीचा देशाबरोबर उभा राहिला याची इतिहासात नोंद होईल".
रशियाच्या सैनिकांनी मारियूपोल शहरातील एका हॉस्पिटलवर कब्जा केला आहे. येथे सुमारे ५०० नागरिकांना डांबले आहे. मारियूपोलच्या महापौरांनीहीही या माहितीला दुजोरा दिला आहे. ५०० हून अधिक नागरिकांनी हॉस्पिटलमधून बाहेर पडू नये, असा आदेश रशियाच्या लष्कराने दिला आहे. दरम्यान, युद्धात रशियाचे मेजर जनरल ओलेगा मित्येवर हे मारले गेले आहेत. मारियूपोलमध्ये रशियाच्या सैनिकांनी हल्ला केला. प्रतिहल्ल्यात मित्येवर मारले गेल्याचा दावा युक्रेनच्या लष्कराने केला आहे.
हेही वाचलं का?