कोविशिल्ड, फायझर लसीच्या अँटीबॉडीज तीन महिन्यात होतात कमी | पुढारी

कोविशिल्ड, फायझर लसीच्या अँटीबॉडीज तीन महिन्यात होतात कमी

लंडन : पुढारी ऑनलाईन

कोविशिल्ड, फायझर लसींच्या अँटीबॉडीज १० आठवड्यानंतर तब्बल ५० टक्क्यांनी कमी होतात असा शोधनिबंध लॅन्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासानुसार या दोन्ही लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सहा आठवड्यांनी एकूण अँटीबॉडीज कमी होण्यास सुरुवात होते.

युनिव्हरसिटी कॉलेज लंडन ( युसीएल ) येथील अभ्यासकांनी जर अशा प्रकारे अँटीबॉडीज कमी होत गेल्या तर लसीची नव्या व्हेरियंटविरुद्धची संरक्षण क्षमता काळजीचा विषय ठरेल. पण, असे असले तरी हे कधी होईल याचा अजून त्यांनी अंदाज बांधलेला नाही.

युसीएल अभ्यासात कोविशिल्ड फायझर यांची तुलना करता दोन डोसनंतर फायझरमध्ये कोविशिल्डपेक्षा ( अॅस्ट्राझेनका ) चांगल्या अँटीबॉडीज तयार होतात.

याचबरोबर ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यांच्या शरिरात ज्यांना कोरनाची लागण होऊन गेली आहे त्यांच्यापेक्षा जास्त अँटीबॉडीज तयार झाल्याचे आढळून आले आहे.

कोविशिल्ड, फायझर तुलनेत कोण भारी?

युसीएलच्या मधुमिता श्रोत्री यांनी सांगितले की, ‘कोविशिल्ड, फायझर लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींच्या शरिरात सुरुवातीला जास्त अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. त्यामुळेच त्यांचे कोरोना संसर्गापासून चांगले संरक्षण होत आहे.’

त्या पुढे म्हणाल्या की, ‘असे असले तरी आम्हाला या अँटीबॉडीज दोन ते तीन महिन्यांनी लक्षणीयरित्या घटत जात असल्याचेही आढळून आले आहे.’या अभ्यासात अभ्यासकांनी १८ आणि त्याच्या वरील ६०० लोकांचा अभ्यास केला आहे.

दरम्यान, अभ्यासकाने अँटीबॉडीजचा स्तर घसरण्याचा वैद्यकीय परिणाम काय होतो हे अजून स्पष्ट केलेले नाही. अँटीबॉडीजमध्ये काही प्रमाणात घट होणे हे स्वाभाविक आहे.

तसेच नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार लस घेतल्याने रुग्ण गंभीर होण्यापासून संरक्षण मिळते हे दिसून आले आहे.

कोविशिल्ड, फायझर अँटीबॉडीजची घसरण

फायझरचा अँटीबॉडीज स्तर २१ ते ४१ दिवसात ७५०६ युनिट पर मिलीलिटर पासून ७० आणि त्यापेक्षा जास्त दिवसांनी ३३२० युनिट पर मिलीलिटर पर्यंत घसरतो.

तर कोविशिल्डच्या अँटीबॉडीजचा स्तर ० ते २० दिवसात १२०१ युनिट प्रति मिलीलिटर इतका असतो. तो ७० ते त्यापेक्षा जास्त दिवसांनी १९० युनिट प्रति मिलीलिटर इतका घसरतो.

याबाबत युसीएलमधील प्रोफेसर रॉब अलड्रेज यांनी सांगितले की, ‘आम्ही कोणाला बुस्टर डोस देण्यासाठी प्राथमिकता द्यावी याचा विचार करत होतो. त्यावेळी आमच्या डाटानुसार ज्यांना सर्वात लवकर लस देण्यात आली आहे विशेषकरुन कोविशिल्ड, त्याच्या शरिरात सध्या अँटीबॉडीजचा स्तर सर्वात कमी असण्याची शक्यता आहे.’

त्यामुळे ज्या लोकांना आधीच व्याधी आहेत, जे लोक ७० किंवा ७० पेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांना बुस्टर डोस देण्यास प्राथमिकता देण्याचा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : 

Back to top button