पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की सोमवारी सकाळी नाटो देशांना एक इशारा दिला की, "आमच्यावर होणार हल्ले थांबवण्यासाठी त्वरीत योग्य निर्यण घ्या. नाटो वेळ असेपर्यंत योग्य निर्णय घेतले नाही तर रशिया नाटोच्या सदस्य देशांवरही निशाणा साधेल", असा इशारा झेलेन्स्की यांनी दिला आहे. (युक्रेन संकट)
झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर हा इशारा दिला आहे. झेलेन्स्की यांनी नोटाला म्हटलेलं आहे की, "आकाशात नो फ्लाय झोन घोषीत करा." रशियन सैन्याने पोलिश सीमेजवळील युक्रेनी सैन्याच्या बेसवर हल्ला केल्यानंतर झेलेन्स्कींनी हे विधान केले आहे. "जर तुम्ही आमच्या आकाशाला नो फ्लाय झोन घोषीत केले नाही, तर रशियाची क्षेपणास्त्रे नाटो देशांवर कोसळायला वेळ लागणार नाही."
झेलेन्स्की आपल्या व्हिडिओ मॅसेजमधून हेदेखील सांगितलं की, मागील वर्षीदेखील नाटोला इशारा दिला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, नियमांशिवाय रशिया युद्ध करू शकतो आणि ते नाॅर्ड स्ट्रिम २ पाईपलाईनला एक शस्त्रासारखं वापरलं जाऊ शकतात. क्षेत्रीय गव्हर्नर मॅक्झिम कोजिट्स्की म्हणाले की, "रशियान विमानांनी सुमारे ३० राॅकेट टाकले आहेत."
युक्रेनच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितल्यानुसार रशियाने लीवजवळ हल्ला केला आहे. जे शांतता आणि सुरक्षेसाठी काम करणाऱ्यांचे स्थळ होते. इथं अनेक परदेशी संघटना काम करतात. जखमी किती झालेले आहेत, याची माहिती अजूनही समोर आलेली नाही. (युक्रेन संकट)
हे वाचलंत का?