कोरोना लसीमुळे 21 आजारांपासून बचाव | पुढारी

कोरोना लसीमुळे 21 आजारांपासून बचाव

जीनिव्हा ; वृत्तसंस्था : कोरोना प्रतिबंधक लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) एक आनंदाची बातमी दिली आहे. लसीमुळे केवळ कोरोनापासूनच नाही, तर एकूण 21 अन्य आजारांपासून संरक्षण मिळते, असे त्यांनी म्हटले आहे.

लसीकरण मोहिमेमुळे कोरोना नियंत्रणात येत आहे. लस हेच कोरोनावरील परिणामकारक उत्तर आहे, असे तज्ज्ञ सांगत आहेत; तर दुसरीकडे अनेकजण लसीविषयी गैरसमज आणि अफवाही पसरवत आहेत. अशात जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना प्रतिबंधक लसीमुळे 21 आजारांपासून संरक्षण मिळते, असा दावा केल्याने त्याला एक वेगळे महत्त्व आहे.

लस घेतल्यामुळे ज्या 21 हून अधिक आजारांपासून बचाव करता येतो, त्या आजारांची यादीच ‘डब्ल्यूएचओ’ने ‘व्हॅक्सिन्स वर्क’ या ‘हॅशटॅग’सह जाहीर केली आहे.

सर्व वयोगटांना लस उपयुक्‍त

कोरोना लस सर्व वयोगटांना संरक्षण देते, असा दावाही ‘डब्ल्यूएचओ’ने केला आहे. एकप्रकारे जगभरात आता मुलांचेही लसीकरण सुरू करण्यास हिरवा झेंडाच दिलेला आहे. त्यामुळे या लसीकरणाला अधिक गती मिळणार आहे.

या आजारांपासूनही बचाव…

गर्भाशयाचा कर्करोग, पटकी, कॉलरा, घटसर्प, इबोला, हिपेटायटिस बी, इन्फ्लुएंझा, जपानी एन्सेफलायटिस, गोवर, मेंदुज्वर, गालगुंड, डांग्या खोकला, फुप्फुसाचा दाह, न्यूमोनिया, पोलिओ, रेबिज (हायड्रोफोबिया), रोटा व्हायरस, गोवर, धनुर्वात, विषमज्वर, कांजण्या, पीतज्वर.

Back to top button