ब्रुनेईच्या पंतप्रधानांकडे दोन हजार महागड्या मोटारी!

लंडन : जगभरातील अतिश्रीमंत लोक व त्यांची विलासी राहणी लोकांना थक्क करीत असते. यामध्येच ब्रुनेई मधील सुल्तानाचा समावेश आहे. या सुल्तानाने स्वतःकडेच देशाचे पंतप्रधानपदही ठेवलेले आहे. या पंतप्रधानांकडे तब्बल दोन हजार महागड्या मोटारींचे कलेक्शन आहे.

सुल्तान हस्सनल बोल्किअह यांच्या अगणित संपत्तीची नेहमीच जगभर चर्चा होत असते. हस्सनल बोल्किअह हे प्रसिद्ध फुटबॉलपटू फॅक बोल्किअहचे नातेवाईकही आहेत. फॅकही जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटूंपैकी एक आहे.

ब्रुनेई च्या सुल्तानाला महागड्या गाड्यांचा शौक आहे. त्यांच्याकडे चार खर्वपेक्षाही अधिक किमतीच्या दोन हजार गाड्या आहेत. यापैकी एकही गाडी विकत घेत असताना श्रीमंत लोकही दहावेळा विचार करतात! हस्सनल बोल्किअह यांच्याकडे 600 रोल्स रॉईस, 570 मर्सिडिझ बेन्झ, 450 फेरारी तसेच 380 बेंटले मोटारी आहेत.

याशिवायही अन्य अनेक प्रकारच्या मोटारी त्यांच्या शाही गॅरेजमध्ये उभ्या आहेत. सुल्तानाची संपत्ती 13 अब्ज युरो म्हणजेच सुमारे 13 खर्व, 12 अब्ज, 13 कोटी, 97 लाख, 5 हजार, पाचशे रुपयांची आहे. यापैकी चार खर्व रुपये त्यांच्या मोटारींचीच किंमत आहे!

Exit mobile version