साबुदाणा : उपवासाची सोय करणारा साबुदाणा भारतात कसा आला? | पुढारी

साबुदाणा : उपवासाची सोय करणारा साबुदाणा भारतात कसा आला?

पुढारी ऑनलाईल डेस्क : साबुदाणा म्हंटलं की, आपल्या तोंडाला पाणी सुटतं. उपवासात पहिल्यांदा साबुदाणा आठवतो. साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याची खीर, साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे पापड… असे कितीतरी साबुदाण्याचे पदार्थ आपल्या नजरेसमोर येतात. अहो, इतकंच काय… आपली काही माणसं तर साबुदाणा खायला मिळावा म्हणून उपवास धरतात. म्हणजे काय राव… साबुदाणा आहेच इतका ग्रेट. पण, या साबुदाण्याचा इतिहास काय?

तर मंडळी! भारतात पहिल्यांदा साबुदाण्याची खिचडी ही केरळ राज्यातील त्रावणकोरच्या राजवाड्यातील शाही स्वंयपाकघरात तयार करण्यात आली. साबुदाण्याच्या खिचडी बनविण्यात त्रावणकोरचे राजे विशाखम थिरूनल रामा वर्मा यांचा मोठा वाटा आहे.

ही घटना आहे १८८१ सालची. एकदा राजे विशाखम शेजारील राज्यांमध्ये प्रवास करत होते. तेव्हा त्यांना मोत्यासारख्या दिसणाऱ्या साबुदाण्याकडे लक्ष गेले. हे आकर्षक दाणे कॅसवा (टॅपिओका) वनस्पतीपासून तयार करण्यात आले होते. तिथं त्यांना कळलं की, एका कॅसावा वनस्पतीपासून ८०० किलो साबुदाणा तयार होतो.

तेव्हा विशाखम राजांनी विचार केला की, आपल्या राज्यातील दुष्काळामुळे निर्माण झालेली अन्नाची समस्या यातून मिटवता येईल. त्यामुळे त्यांनी काही कॅसावा रोपं त्यांनी घेतले. यावेळी त्रावणकोर या राज्यात दुष्काळ पडला होता. त्यामुळे त्यांना शेजारील राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागत होते.

या राजाने आपल्या राजवाड्याच्या परिसरात ही रोपं लावली. त्यातून त्यांनी साबुदाण्याची निर्मिती केली. राजवाड्याच्या स्वयंपाक घरात पहिल्यांदा साबुदाणा खाण्याचा पदार्थ म्हणून वापरला गेला. त्यातून खात्री पटल्यानंतर पुन्हा कॅसावा रोपांची लागवड केली.

राजा वर्माचा यांचा हा प्रयोग काही महिन्यांनंतर यशस्वी झाला. त्यांनी पुन्हा जेथून ती रोपं घेतली होती, तेथे भेट दिली. त्यांनी आणखी टॅपिओका झाडं घेतली. त्यातून साबुदाण्याचे उत्पन्न घेतलं. आणि त्याचा वापर प्रत्यक्ष शाही जेवणामध्ये करण्यात आला. अशा पद्धतीने १९ व्या शतकात राजा विशाखम यांच्यामुळे भारतीय जेवणामध्ये साबुदाण्याचे पदार्थ आले.

साबुदाण्याचा इतिहास पाश्चात्य साहित्यात असं सांगितला जातो की, टॅपिओका हे झाडं मूळचं दक्षिण अमेरिकेचे आहे. या झाडाचे कंद म्हणजेच मुळापासून साबुदाणा तयार केला जातो. १२२५ मध्ये झाओ रुकोव यांच्या ‘झू फॅन झीही’ या पुस्तकाता साबुदाण्याचा पहिला उल्लेख सापडतो.

१२ व्या शतकातच साबुदाणा वापरला गेल्याची नोंद सापडते. त्याचा इतिहास वाचला तर, लक्षात येतं की, युरोपमधल्या देशांनी जशा जगात वसाहती उभ्या केल्या, तशा भारतातही वसाहती उभ्या केल्या होता. त्यामुळे भारताची खाद्य संस्कृती आणि पाश्चात्य खाद्यसंस्कृती सरमिसळ करून टाकली.

आता टॅपिओका झाडा अनुकूवल वातावरण हे केरळमध्ये होतं. या झाडाला उष्ण दमट हवामान लागतं. ते केरळमध्ये होतं. त्यामुळे टॅपिओकाची झाडांची शेती केरळात केली जाऊ लागली. त्यातून तामिळनाडूमध्ये साबुदाणा मोठ्या प्रमाणात उत्पन्न होऊ लागला.

आषाढी एकादशी असो किंवा श्रावण सोमवार असो किंवा इतर कोण साबुदाणा खिचडी महत्वाची आहे. तर अशा  या साबुदाण्याचा प्रवास झाला आणि आपल्या उपवासाच्या पदार्थांमध्ये ‘साबुदाणा’ आला.

  •  आषाढी एकादशी : मराठी कलाकारांचा ‘विठ्ठल विठ्ठल’ नामाचा जयघोष, पहा कलाकारांचे फोटो

आषाढी एकादशी : मराठी कलाकारांचा ‘विठ्ठल विठ्ठल’ नामाचा जयघोष

हे वाचलंत का? 

Back to top button