texas : टेक्सासमध्ये एका माथेफिरूने कैदेत ठेवलेल्या चौघांची सुटका, पाकिस्तानी शास्त्रज्ञाला सोडण्यावरून केले होते कैद | पुढारी

texas : टेक्सासमध्ये एका माथेफिरूने कैदेत ठेवलेल्या चौघांची सुटका, पाकिस्तानी शास्त्रज्ञाला सोडण्यावरून केले होते कैद

टेक्सास ; पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील कॉलिव्हिल शहरातील यहुदी प्रार्थनास्थळामध्ये एका माथेफिरूने चार जणांना बंदिस्त ठेवले होते. दरम्यान चार जणांपैकी एकाची सुटका करण्यात आली. (texas)

Colleville पोलीसांकडून याबाबत निवेदनाद्वारे माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. बंदिस्त असलेल्या एका पुरूषाची मुक्तता करण्यात आली आहे. त्याची कोणतीही दुखापत किंवा शारीरिक इजा न होता सुटका करण्यात आली. याचबरोबर तिघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

या व्यक्तींना शक्य तितक्या लवकर त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याचबरोबर त्यांची वैद्यकीय तपासणी देखील केली जाणार आहे. तसेच एफबीआयकडून चार जणांना सोडल्यानंतर मोकळा श्वास घेतला आहे.

शनिवारी सकाळी १०:४१ च्या सुमारास, कॉलिविले पोलीस विभागाला प्लेझंट रन रोडच्या ६१०० ब्लॉकमध्ये कॉल आला. यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तेथील आपत्कालीन परिस्थिती पाहता आजूबाजूचा परिसर रिकामा करत सिल करण्यात आला आहे.

texas : कैदेत असलेले सर्व सुरक्षित

कोलीविले पोलिस विभाग, एफबीआयचे डॅलस फील्ड अधिकारी, टेक्सास सार्वजनिक सुरक्षा विभाग, नॉर्थ टेरंट प्रादेशिक स्वॅाट टीम यासह अन्य एजन्सी घटनास्थळी तळ ठोकून आहेत, असे प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उपासनागृहात एकाला सोडण्यात आले परंतु काहीजण अटकेत होते. आतमध्ये असलेल्यांपैकी कोणालाही इजा झालेली नसल्याची ही माहिती होती.

पोलीस SWAT टीम एका व्यक्तीशी बोलत होती. फेसबुकवर शब्बत मॉर्निंग सर्विसच्या एका लाइव्ह दरम्यान एका माणसाचा आवाज मोठ्याने बोलत असल्याचा ऑडिओ कॅप्चर करण्यात आला होता. यामुळे काही विपरित होईल का याबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैदेत ठेवलेल्या माथेफिरूने माजी पाकिस्तानी शास्त्रज्ञ आफिया सिद्दीकीच्या सुटकेची मागणी केली आहे. अफियाला अफगाणिस्तानात कोठडीत असताना अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. सिद्दीकी सध्या टेक्सासमधील फोर्ट वर्थ येथील एफएमसी कार्सवेल या फेडरल तुरुंगात बंद आहे.

Back to top button