चीन्यांकडून नियमाचा कडेलोट...कोरोना रुग्‍णांना डांबल जातयं लोखंडी बॉक्‍समध्‍ये!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
कोरोनाचे महासंकट संपूर्ण जगासमोरील मोठे आव्‍हान ठरलं आहे. गेली दोन वर्ष या विषाणुने मानवजातीला वेठीस धरले आहे. अशा या कोरोनाचा जन्‍म चीनमध्‍ये झाला, असा आरोप अमेरिकेकडून करण्‍यात होता. याच चीनमधील एक भीषण वास्‍तव जगासमोर आलं आहे. चीनने कोरोना रुग्‍ण शून्‍यवर आणण्‍याची योजना ( China’s Zero Covid Rule ) आखली आहे. याच योजनेचा एक भाग म्‍हणून कोरोनाचा संसर्ग झालेल्‍या रुग्‍णांना सक्‍तीने लोखंडी बॉक्‍समध्‍ये डांबले जास्‍त आहे. या अमानुष नियमाचा पदार्फाश आंतरराष्‍ट्रीय माध्‍यमांनी केल्‍यानंतर संपूर्ण जगाला धक्‍का बसला आहे. कोरोनाच्‍या नावाखाली चीनमधील सर्वसामान्‍य नागरिकांवर सुरु असलेल्‍या अत्‍याचाराने जग हादरले आहे.

कोरोनामुक्‍त देश करण्‍याचा आटापीटा सध्‍या चीनमध्‍ये सुरु आहे. यामुळेच कोरोनाची रुग्‍ण संख्‍या शून्‍यावर ठेवण्‍यासाठी या देशाची धडपड सुरु आहे. यासाठी आता कोरोनाचा संसर्ग झालेल्‍या रुग्‍णांना विलगीकरणाच्‍या नावाखाली हजारो रुग्‍णांना जबरदस्‍तीने लोखंडी बॉक्‍समध्‍ये ठेवले जात आहे. चीनमधील शांक्‍सी प्रांतातील एक व्‍हिडीओसमोर आल्‍यानंतर ही धक्‍कादायक बाब समोर आली.

ब्रिटनमधील ‘डेली मिल’ने दिलेल्‍या वृतानुसार, चीनमधील शांक्‍सी प्रांतात कोरोनाची लागण झालेल्‍या गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्‍येष्‍ठ नागरिकांना विलगीकरणाच्‍या नावाखाली लोखंडी बॉक्‍समध्‍ये ठेवले जात आहे. तसेच घरोघरी पाहणी करुन कोरोनाची लक्षणे असणार्‍या नागरिकांनाही जबदरस्‍तीने अशा विलगीकरणात कोंबले जात आहे.

China’s Zero Covid Rule : २ कोटींहून अधिक नागरिक झाले घरातच कैद!

चीनमध्‍ये कोरोनावर मात करण्‍यासाठी युद्‍धपातळीवर विविध उपाययाेजना राबवल्‍या जात आहेत. कोरोना रुग्‍णांच्‍या संपर्कात आलेल्‍यांना जबरदस्‍तीने विलगीकरणात पाठवले जात आहे. सध्‍या तरी २ कोटींहून अधिक कारांना घरातच कैद ठेवण्‍यात आले आहे. त्‍यांना जीवनावश्‍यक वस्‍तू घेण्‍यांसाठीही घराबाहेर पडण्‍याची परवानगी नाही.

ओमायक्रॉनचे दोन रुग्‍ण आढळले, तब्‍बल ५५ लाखांहून अधिक नागरिक भरडले!

कोरोना रुग्‍णांवर चीन सरकार एवढी सक्‍ती करत आहे की, अनयांग शहरात ओमायक्रॉनचे दोन रुग्‍ण आढळले. झालं या शहरातील सर्वच तब्‍बल ५५ लाखांहून अधिक नागरिकांना घरातच कैद करण्‍याचा फर्मान सरकारने काढले. यापूर्वी १ कोटी ३० लाख लोकसंख्‍या असणारे शीआन आणि ११ लाख लोकसंख्‍या असणारे युझोउ शहर लॉकडाउन करण्‍यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सध्‍या चीनमध्‍ये १.९६ कोटी लोकसंख्‍या लॉकडाउनमध्‍ये आहे. मोठ्‍या प्रमाणावर चाचण्‍या करण्‍यासाठी अनेक शहरांमध्‍ये लॉकडाउन करण्‍यात आल्‍याचे चीन सरकारने म्‍हटलं आहे.

बीजिंगमध्‍ये हिवाळी ऑलिंपिकची तयारी

बीजिंगमध्‍ये पुढील महिन्‍यात हिवाळी ऑलिंपिकची तयारी सुरु आहे. यामुळे सर्वसामान्‍य नागरिकांवर विविध नियमांची सक्‍ती केली जात आहे. कडक लॉकडाउन सुरु आहे. नागरिकांना कोणत्‍याही परिस्‍थितीत घराबाहेर पडता येणार नाही, असे सरकारने स्‍पष्‍ट केले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांकडील धान्‍य संपले आहे. हजारो नागरिक सोशल मीडीयाच्‍या माध्‍यमातून मदतीसाठी याचना करीत आहेत.

हेही वाचलं का? 

 

 

 

Exit mobile version