पुढारी ऑनलाईन डेस्क : एकीकडे लेबनॉनवरील हवाई हल्ले सुरु असतानाच आता इस्रायली लष्कराने गाझामधील जबलिया येथे जमिनीवरील माेहिम तीव्र केली आहे. इस्रायली सैन्याने जबलियामध्ये हमासच्या अनेक ठिकाणांवर हल्ले केले. तसेच रविवारी रात्री बेरूतमध्ये हिजबुल्लाहच्या शस्त्रसाठ्याला लक्ष्य केले. हल्ल्यापूर्वी हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात यावा, असा इशारा देण्यात आला होता.
मध्य गाझा येथील मशिदीवरील हल्ल्यातील मृतांची संख्या २१ झाली असून, बाराहून अधिक दहशतवादी जखमी झाले आहेत. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी मशिदीवर हल्ला केल्याचा आरोप लेबनॉनकडून केला जात आहे.
इराणच्या कुड्स फार्सचा प्रमुख इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाल्याची चर्चा आहे. तो इस्रायली हल्ल्यात हिजबुल्लाला मदत करण्याच्या उद्देशाने बेरूतला गेला होता; मागील काही तासांपासून ताे बेपत्ता आहे. त्यामुळे इस्रायलच्या हल्ल्यात कुड्स फोर्सचा म्होरक्या ठार झाल्याची चर्चा आहे. मात्र इराणकडूनही याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.