पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. गेल्या तीन दिवसात झालेल्या चार भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाचजण जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास विर्नोडा सरकारी महाविद्यालयासमोर महामार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत.
विर्नोडा येथील सरकारी महाविद्यालयासमोर असणाऱ्या उड्डाणपुलावर कोंबडीवाहू टेम्पोला एका ट्रकने धडक दिल्याने टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो उलटला. यात गंभीर जखमी झालेला चालक नियाझ झारी (वय 38) यांना इस्पितळात नेत असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला. यात जखमी झालेल्या अन्य दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह प्रसार झाला आहे. पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.