‘ईडी’चे गोव्यासह 9 ठिकाणी छापे

income tax raids at nine locations in goa
‘ईडी’चे गोव्यासह 9 ठिकाणी छापेPudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : अंमलबजावणी संचालनालय (ईडी), लखनौ विभागाच्या पथकाने 10 एप्रिल रोजी दिल्ली, नोएडा आणि गोवा येथील 9 ठिकाणी छापे टाकून 30 लाख रुपये रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. ही कारवाई भासिन इन्फोटेक अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., ग्रँड विनेझिया कमर्शियल टॉवर्स प्रा. लि. आणि त्यांच्या प्रमुख अधिकार्‍यांच्या ठिकाणी करण्यात आली. ईडीने ही छापेमारी गौतम बुद्ध नगर (नोएडा, उत्तर प्रदेश) येथील पोलिस स्थानकात भादंसंच्या विविध कलमांतर्गत दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे सुरू केली होती.

या प्रकरणाचा प्रमुख आरोपी सतिंदर सिंग भासिन हा भासिन इन्फोटेक कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली कंपनीने ग्रँड विनेझिया कमर्शियल कॉम्प्लेक्स नावाने एक रिअल इस्टेट प्रकल्प सुरू केला होता. प्रकल्पाची खोटी जाहिरात आणि बनावट आश्वासने देऊन गुंतवणूकदारांना फसवण्यात आले. मात्र, पैसे घेतल्यानंतर गुंतवणूकदारांना मालमत्तेचा ताबा देण्यात आला नाही.

30 लाखांची रोकड जप्त

10 एप्रिल रोजी दक्षिण गोव्यात केलेल्या धडक छापेमारीत ईडीने 30 लाख रुपयांची रोख रक्कम, विविध बँक लॉकरच्या चाव्या, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. तसेच काही बँक खातीदेखील गोठवण्यात आली आहेत. ही कारवाई प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए), 2002 अंतर्गत करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news