

पणजी ः सोशल मीडियावर अलिकडेच ताळगाव येथील सरकारी प्राथमिक शाळा बंद केल्याचे वृत्त व्हायरल झाले होते. ते चुकीच्या माहितीच्या आधारे पसरवले गेले आहे. सदर शाळा बंद केलेली नाही तर शाळेची दुरुस्ती सुरू असल्यामुळे ती तात्पुरती स्थलांतरित करण्यात आली आहे. आमदार मोन्सेरात यांनी सांगितले की शाळा बंद करण्यात आलेली नाही.
शाळेच्या छताच्या दुरुस्तीच्या कामुळे, विद्यार्थ्यांना सुरक्षितता आणि अखंड शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी शाळेच्या आवाराच्या अगदी समोर असलेल्या कासा दो पोवो येथे शाळेचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आल्याची माहिती आमदार मोन्सेरात यांनी दिली.
पुढील 3 दिवसांत शाळेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत परत नेले जाईल. शाळा बंद केली अशा अफवा पसरवून पालक आणि समुदायामध्ये अनावश्यक भीती किंवा गोंधळ निर्माण करून नये, असे आवाहन आमदार मोन्सेरात यांनी केले आहे. ताळगावमधील सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सातत्यपूर्ण शैक्षणिक वातावरण प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे आमदार मोन्सेरात म्हणाल्या.