

पणजी : भाजपचे नेते व माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोप प्रकरणात आता प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी हस्तक्षेप केला आहे. त्यांनी दोन्ही नेत्यांना समज दिली आहे.
याबाबत बुधवारी दामू नाईक यांनी सांगितले, आजगावकर व आर्लेकर यांच्यात सुरू असलेला वाद हा क्षुल्लक आहे. मात्र, ते दोन्ही नेते भाजपचे असल्याने त्यांच्या आरोपाचा परिणाम भाजपच्या छबीवर होत आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांना समज दिली आहे. ज्या काही तक्रारी आहेत त्या पक्षाकडे किंवा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सोडवा. जाहीरपणे आरोप करू नका. निवडणुकीवेळी पक्ष आचरणाचा विचार करून निर्णय घेणार आहे. जे आरोप करता त्याचे पुरावे आहेत तर पोलिसात जा, असेही नाईक म्हणाले. भाजपमध्ये शिस्त आहे आणि ती सर्वांनी पाळायला हवी, असेही नाईक यांनी सांगितले.