पेडणे : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या एका रशियन दाम्पत्य मोरजी समुद्रात बुडाले. रशियन दाम्पत्य समुद्रस्थानासाठी समुद्रात उतरले होते. यात 33 वर्षीय रशियन व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या पत्नीला स्थानिकांनी वाचवले. इरीना आणि दिमित्री असे या दाम्पत्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे 5 वाजता रशियन नागरिक असलेले दिमित्री लव्होव (वय 33) व इरिना रुडेमको मोरजी समुद्रकिनारी पोहत होती. याचवेळी पाण्याच्या जोरदार प्रवाहात दोघेही ओढले गेल्याने समुद्रात बुडाले. स्थानिकांनी त्वरित हालचाल करत इरीनाला वाचवले, पण लव्होव बुडाला. जीवरक्षकांनी दिमित्री याचा मृतदेह समुद्रकिनार्यावर आणला. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.