मासेमारीसाठी गेलेली बोट बाणावली येथे उलटली

पोहून किनारा गाठत ११ खलाशांनी वाचवले स्वतःचे प्राण
A fishing boat overturned at Banavali
मासेमारीसाठी गेलेली बोट बाणावली येथे उलटलीPudhari Photo
Published on
Updated on

पणजी : प्रभाकर धुरी

बाणावली येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट (डोंगी) खराब हवामान आणि अजस्त्र लाटांमुळे उलटली. बोटीवर अकरा खलाशी होते. ते पोहत समुद्र किनाऱ्यावर आल्याने बचावले.

मेनिनन जिझस नावाची ही बोट ग्रेफंस फर्नांडिस यांच्या मालकीची आहे. सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या दरम्यान बाणावली वाड्डी येथे मासेमारीसाठी ही बोट निघाली होती. समुद्र किनाऱ्यापासून १०० मीटर अंतरावर बोट पोचल्यावर खवळलेल्या समुद्राच्या लाटा आणि खराब हवामानामुळे ती उलटली. मात्र त्यावरील ११ खलाशी पोहत समुद्र किनाऱ्यावर आले. ते सर्व झारखंड येथील आहेत. त्यानंतर सकाळी पावणेबारा वाजण्याच्या दरम्यान स्थानिकांच्या मदतीने ती बोटही किनाऱ्यावर आणण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news