गोवा निवडणूक : मायकल लोबो भाजपचा राजीनामा देत म्हणाले, “भाजप आता लोकांचा…” | पुढारी

गोवा निवडणूक : मायकल लोबो भाजपचा राजीनामा देत म्हणाले, "भाजप आता लोकांचा..."

पणजी, पुढारी ऑनलाईन : गोव्याचे मंत्री आणि भाजपचे आमदार मायकल लोबो यांना सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांना प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळासोबतच विधानसभेच्या सदस्यपदाचाही राजीनामा सोमवारी दिलेला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायकल लोबो यांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलेले आहे.

केलनगुटे मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे लोबो यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि गोवा विधानसभाचे अध्यक्ष यांच्याकडे त्यांना राजीनामा सोपविला आहे. लोबो यांना पत्रकारांशी या संदर्भात बोलताना सांगितले की, “मी दोन पदांचा राजीनामा दिलेला आहे. मी विचार करेन की, पुढे कोणते पाऊल उचलायचे आहे. मी भाजप पक्षाच्या सदस्यत्वाचादेखील राजीनामा दिलेला आहे.”

आता काॅंग्रेसमध्ये जाणार का, या प्रश्नाचे उत्तर देताना लोबो म्हणाले की, “माझी इतर राजकीय पक्षांशी चर्चा सुरू आहे. राज्यातील नागरिक भाजपच्या कारभारावरून नाराज आहेत. मतदारांनी मला सांगितले की, भाजप आता सामान्य लोकांचा पक्ष राहिला नाही. स्थानिक पातळीवर भाजप कार्यकर्त्यांच्या मनामध्येही दुर्लक्ष होत असल्याची भावना आहे.”

भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी गोवा विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर १४ फेब्रुवारी ४० जागांवर मतदान केले जाणार आहे. यावेळी भाजप, काॅंग्रेस, गोवा फाॅरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी, आम आदमी पार्टी, तृणमूल काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस आदी राजकीय पक्षा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

पहा व्हिडीओ : जय भीम चित्रपटातल्या गाण्याचं हे मराठी कव्हर सॉंग जरूर ऐका

Back to top button