गोवा : लवकरच विजेचा शॉक; दरवाढीचा प्रस्ताव : 24 पर्यंत हरकतीची मुदत | पुढारी

गोवा : लवकरच विजेचा शॉक; दरवाढीचा प्रस्ताव : 24 पर्यंत हरकतीची मुदत

पणजी; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील वीज ग्राहकांना नव्या वर्षात वीज दरवाढीला सामारे जावे लागणार आहे. दि. 24 जानेवारीपर्यंत जनतेच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

वीज खात्याने प्रति किलोवॅट 15 ते 60 पैसे दरवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. वीज खात्याने महसुलातील तफावत भरून काढण्यासाठी नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच वीज दरवाढ करण्याचे ठरवले आहे. घरगुती वीज वापरणार्‍या नागरिकांसाठी प्रति किलोवॅट 15 ते 60 पैसे दरवाढीचा प्रस्ताव आहे. उच्च दाबाची वीज वापरणार्‍या घरगुती ग्राहकांसाठी 70 पैसे प्रति किलोवॅट दरवाढीचा प्रस्ताव आहे.

व्यावसायिक कमी दाबाची वीज वापरणार्‍या ग्राहकांसाठी 45 पैशांवरून 75 पैसे प्रति किलोवॅट दरवाढीचा प्रस्ताव आहे. 20 किलोवॅटपर्यंत भार असलेल्या ग्राहकांसाठी निश्चित शुल्कात महिना 5 रुपये प्रति किलो वॅट आणि 20 किलोवॅटपेक्षा जास्त भार असलेल्या ग्राहकांसाठी निश्चित शुल्कात महिना 10 रुपये प्रति किलो दरवाढीचा प्रस्ताव आहे. या वीज खात्याने दरवाढीबाबत नागरिकांकडून हरकती मागवल्या आहेत.

Back to top button