गोवा : कामुर्लीत घराला आग; दोन लाखांचे नुकसान | पुढारी

गोवा : कामुर्लीत घराला आग; दोन लाखांचे नुकसान

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा : कामुर्ली, बार्देश येथे घराला आग लागून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. म्हापसा अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दि.26 रोजी सायंकाळी चार वाजता घडली. सोनारवाडो, कामुर्ली येथील गोलतेकर बार जवळ संगीता वेर्णेकर यांच्या घराला आग लागली. या आगीत घराचे वाशे, पट्ट्या असे छताचे सामान, कौले, घरातील भांडी असे सामान जळून खाक
झाले.

म्हापसा अग्निशामक दलास माहिती मिळताच दलाचे अशोक परब, प्रेमानंद कांबळी, परेश मांद्रेकर, विष्णू नाईक यांनी आग आटोक्यात आणून सुमारे पाच लाखांचे सामान वाचवले. आगीचे नक्की कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, आगीची माहिती मिळताच मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व वेर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले.

Back to top button