Goa Tourism : गोव्यात येत असाल तर या गोष्टी माहिती आहेत का? | पुढारी

Goa Tourism : गोव्यात येत असाल तर या गोष्टी माहिती आहेत का?

पणजी; पुढारी ऑनलाईन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पर्यटनासाठी (Goa Tourism)  गोव्यात संचारबंदी सुरु आहे. पण, तरीही पर्यटनासाठी  गोव्यात पर्यटकांची (Goa Tourism) वर्दळ वाढत आहे. राज्यातील किनारे पर्यटकांनी फुलले आहेत. चर्च आणि आणि मंदिरांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्यासुद्धा अधिक आहे.

तुम्ही जर येथे येणार असाल तर त्यासाठीचे नियम आणि मार्गदर्शक तत्वे तुम्हाला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

सगळ्यांमध्ये कोरोनाच्या नियमांचा मात्र फज्जा उडत आहे. पोलिसांची पथके गस्त घालत आहे. असे असले तरी त्यांची संख्या कमी आहे. येथे पुन्हा कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नियम कडक करण्यासाठीची मागणी जोर धरूत आहे.

येत्या काही दिवसात गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सणासाठी आणि पर्यटनासाठी नवा एसओपी येण्याची शक्यता आहे. यामध्ये नियम तोडणाऱ्याला अधिक दंड असणार आहे. त्यामुळे गोव्यात येत असाल तर कोरोनाच्या नियमाचे पालन करणे अत्यावश्यक आहे.

आणखी काही नियम

  •  गोव्यात प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडे आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल असणे अत्यावश्यक आहे. तो नसेल तर अँटीजेन अहवाल किंवा लसीचे दोन डोस घेतल्याचा सबळ पुरावा हवाच हवा.

– संचारबंदी असल्याने गटामध्ये फिरण्यास बंदी आहे.

– किनाऱ्यावर बसून मद्यपान करण्यास बंदी आहे.

– मास्क आणि सामाजिक अंतर ठेवले नाही तर पोलिसांकडून दंड आकाराला जाऊ शकतो.

– चोरीच्या मार्गाने आलात आणि गोव्यात येऊन सापडलात तर शिक्षेस पात्र ठराल.

जबाबदार पर्यटकांची गरज : डॉ. बांदेकर

राज्याला पर्यटकांची गरज तर आहेच. पण, पर्यटक जबाबदार असावेत. नियमभंग करून कोरोना  संसर्ग वाढविणारे नकोत. सर्वांनी नियमांचे पालन केले तर कोरोनाची तिसरी लाट येणार नाही. आणि हे राज्य सर्वांसाठी खुले राहील. त्यामुळे येथे याल तर स्वागत आहे. मात्र जबाबदारीने वागा.

– डॉ. शिवानंद बांदेकर, डीन, गोमेकॉ.

Back to top button