गोवा : पंचायत निवडणुकीत भाजपचे उमेदवार बहुमतांनी विजयी होतील : आमदार उल्हास तुयेकर | पुढारी

गोवा : पंचायत निवडणुकीत भाजपचे उमेदवार बहुमतांनी विजयी होतील : आमदार उल्हास तुयेकर

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : रूमडामळ दवर्ली, दवर्ली- दिकरपाल व आके बायश या तिन्ही पंचायतीत भाजप उमेदवारच बहुमतांनी विजयी होतील, असा विश्वास नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी व्यक्त केला. मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून भाजपचे पॅनलच निवडून येणार, असा दावा देखील त्यांनी केला आहे.

केंद्रात तसेच राज्यात भाजपचे डब्बल इंजिन सरकार आहे. हे विकास करणारे सरकार असून जनतेला सरकारच्या कामांची जाणीव आहे. माझ्या कामाची पोचपावती म्हणून जनतेने आमदार केले. पंचायत निवडणुकीतही मतदार भाजपने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांना पाठिंबा देतील. पंचायतीवर भाजपचेच मंडळ स्थापन होणार असल्याचे आमदार तुयेकर यांनी म्हटले आहे.

पंचायतींना अधिकार देण्यावरून विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, जिल्हा पंचायतींपेक्षा पंचायतीकडे अधिकार जास्त आहेत. गावातील अनेक कामांसाठी पंचायतीकडे यावे लागते, पंचायत गावांच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. पंचायतींना आणखी अधिकार मिळावेत यासाठी प्रयत्न करण्याचे अश्वासन त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा : 

Back to top button