पणजीत आढळला अनोळखी मृतदेह | पुढारी

पणजीत आढळला अनोळखी मृतदेह

पणजी; पुढारी वृत्तसेवा: पणजी पाटो परिसरातील मांडवी पुलापलीकडील दिवजा सर्कल येथे सोमवारी एका अनोळखी व्यक्तीचा वाहून आलेला मृतदेह पोलिसांना सापडला. सुमारे 60 ते 70 वयाच्या पुरुषाचा हा मृतदेह असून, या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

सकाळी 11 च्या दरम्यान पोलिसांना फोन करून दिवजा सर्कल जवळील पाण्यात कुणाचा तरी मृतदेह तरंगत असल्याचे कळवल्यानंतर पोलिस पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाला बोलावून वाहून आलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला.

पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्याची ओळख पटवणारी कुठलीच वस्तू त्याच्या अंगावर सापडली नाही. फक्त 200 रुपये त्याच्या खिशात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. पंचनामा करून मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे.

Back to top button