गोवा : चला... मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया | पुढारी

गोवा : चला... मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  13 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा आज (शुक्रवार) पडदा उघडणार आहे. महोत्सवात चित्रपट रसिकांना 20 हून अधिक चित्रपट पाहता येणार आहेत. महोत्सवाच्या उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तर अतिथी म्हणून हिंदी चित्रपट अभिनेत्री रविना टंडन उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन सोहळा दि. 5 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता आयनॉक्स पणजी येथे होणार आहे. यावेळी पाच दशकांहून अधिक काळ चित्रपट सृष्टीत काम केलेल्या अशोक सराफ यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या चित्रपटांचे खेळ
महोत्सवात तमाशा लाईव्ह, सहेला रे, क्रिप्टो आज्जी, जून, पॉण्डेचेरी, मी वसंतराव, चंद्रमुखी, झोंबिवली, स्थळपुराण, कारखानिसाची वारी, धिड, कडू-गोड, पोत्र, गोदावरी, तिचं शहर होणं, फुलराणी, अनन्या, टाईमपास-3, गोदाकाठ आणि पैठणी या चित्रपटांचा समावेश आहे.

कलावंतांची मांदियाळी
महोत्सवात सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, नेहा पेंडसे, सई ताम्हणकर, अमेय वाघ, किशोर कदम, मृणमयी गोडबोले, संजय जाधव, सुहृद गोडबोले, सचिन कुंडलकर, आदित्य सरपोतदार, अनंत महादेवन, प्रसाद ओक आणि गजेंद्र अहिरे असे नामवंत कलाकार हजेरी लावणार आहेत.

Back to top button