गोवा : पंचनाम्यासाठी निघालेले दोघे पोलिस अपघातात जखमी | पुढारी

गोवा : पंचनाम्यासाठी निघालेले दोघे पोलिस अपघातात जखमी

वास्को; पुढारी वृत्तसेवा :  अपघाताचा पंचनामा करण्यासाठी जाणारे वेर्णा पोलिस स्थानकातील हवालदार आशिष कुमार शिलकय्या व शिपाई सागर राणे यांना रेंट ए कारने ठोकरल्याने जखमी झाले. त्यांना उपचारासाठी चिखली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर तेथे उपचारांती घरी पाठविण्यात आले. या अपघातप्रकरणी वेर्णा पोलिसांनी कारचालकाला वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात
पाठविले.

सांकवाळ गावात गुरुवारी एका ठिकाणी अपघात झाल्याचा संदेश मिळाल्यावर हवालदार शिलकय्या व शिपाई राणे हे दुपारी तीनच्या दरम्यान पोलिस मोटारसायकलने अपघातस्थळी निघाले होते. ते शिंदोळे उपासनगर तिठ्यावर पोहोचले असता त्यांना रेंट ए कारने जोरदार धडक दिली. त्यामुळे ते मोटारसायकलसह झाडीत पडले. या अपघातात शिलकय्या यांच्या डोक्याला, हाताला तर सागर राणे याच्या हातापायाला दुखापत झाली.

या अपघातामध्ये मोटारसायकल व कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले. ही कार पर्यटक चालवित होता. याप्रकरणी वेर्णा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Back to top button