गोवा : तिसवाडीत होणार दुरंगी, तिरंगी लढती | पुढारी

गोवा : तिसवाडीत होणार दुरंगी, तिरंगी लढती

पणजी; विठ्ठल गावडे पारवाडकर :   तिसवाडी तालुक्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ येतात. पणजी, ताळगाव, सांताक्रुझ, सांत आंद्रे व कुंभारजुवा हे ते पाच मतदारसंघ आहेत. तिसवाडी तालुक्यात 19 पंचायती व पणजी महापालिका येते. यापैकी चोडण माडेल पंचायत मये मतदारसंघात येते. तर ताळगाव पंचायतीचा कार्यकाळ संपलेला नसल्याने 10 ऑगस्ट रोजी या पंचायतीची निवडणूक होणार नाही. त्यामुळे चोडणसह तिसवाडीतील 18 पंचायतींची निवडणूक 10 रोजी होत आहे. तिसवाडीतील पणजी मतदारसंघात पूर्ण एकही पंचायत नाही.

महापालिकेचा बहुतांश भाग व जुने गोवे पंचायतीचे दोन प्रभाग पणजीत येतात. तर ताळगाव मतदारसंघात पणजी महापालिकेचे काही प्रभाग व ताळगाव पंचायत येते. तिसवाडीतील सांताक्रुझ मतदारसंघात सांताक्रुझ, मेरशी व चिंबल या प्रत्येकी 11 प्रभागाच्या तीन मोठ्या पंचायती येतात.सांंताक्रुझ पंचायतीचा विचार करता येथे प्रभाग 11 मध्ये दुरंगी लढत असून प्रभाग 4,6,7 व 10 मध्ये तिरंगी लढत आहे. सर्वात जास्त उमेदवार प्रभाग 5 मध्ये 7 आहेत.

मेरशी पंचायतीत प्रभाग 11 मध्ये दुरंगी लढत असून प्रभाग5,6,7,8 व 9 मध्ये तिरंगी लढत आहे. सर्वात जास्त उमेदवार प्रभाग 1 मध्ये 7 आहेत. चिंबल पंचायतीमध्ये प्रभाग 7 मध्ये तिरंगी लढत असून सर्वात जास्त उमेदवार प्रत्येकी 8 प्रभाग 1 व 2 मध्ये आहेत. सर्वच प्रभागांमध्ये उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून मतदारांच्या भेटी-गाठीवर भर देण्यात येत आहे.

160 प्रभागांसाठी 583 उमेदवार
तिसवाडी तालुक्यातील सांताक्रुझ, सांत आंद्रे व कुंभारजुवे या तीन मतदारसंघातील 18 पंचायतीच्या 160 प्रभागांसाठी 583 उमेदवार उभे आहेत. त्यांनी घरोघरी प्रचारावर भर दिलेला आहे. पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर होत नसली तरी भाजप व काँग्रेसच्या नेत्यांनी आपले समर्थक निवडून यावेत यासाठी प्रयत्न चालवले आहेत. सांत आंद्रे मतदारसंघात भाजपचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा आरजीचे विद्यमान आमदार विरेश बोरकर यांनी आपापल्या समर्थकासाठी जोर लावलेला आहे. सांताक्रुझमध्ये काँग्रेस आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांच्यासह भाजपचे विविध नेते आपापल्या समर्थकासाठी मतदाराकडे संपर्क साधत आहेत. तर कुंभारजुवेमध्ये उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक हे काँग्रेस आमदार राजेश फळदेसाई यांच्याकडे पंचायती जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करत आहेत.

तालुक्यातील पंचायती आणि प्रभागनिहाय उमेदवार
सांताक्रुझ पंचायत (एकूण 11 प्रभाग ) ः प्रभाग 1 – उमेदवार 4, प्रभाग 2- 4, प्रभाग 3-5, प्रभाग 4-3, प्रभाग 5- 7, प्रभाग 6-3, प्रभाग 7-3, प्रभाग 8-4, प्रभाग 9-6, प्रभाग 10-3, प्रभाग 11-2.
मेरशी पंचायत (एकूण 11 प्रभाग ) ः प्रभाग 1 – उमेदवार 7, प्रभाग 2 – 4, प्रभाग 3-4, प्रभाग 4-5, प्रभाग 5- 3, प्रभाग 6-3, प्रभाग 7-3, प्रभाग 8-3, प्रभाग 9-3, प्रभाग 10-4, प्रभाग 11-2.
चिंबल पंचायत (एकूण 11 प्रभाग ) ः प्रभाग 1 – उमेदवार 8, प्रभाग 2 – 8, प्रभाग 3-4, प्रभाग 4-7, प्रभाग 5- 5, प्रभाग 6-4, प्रभाग 7-2, प्रभाग 8-5, प्रभाग 9-4, प्रभाग 10-5, प्रभाग 11-5.

Back to top button