गोवा : पेडणे तालुक्यात 26 जणांची माघार | पुढारी

गोवा : पेडणे तालुक्यात 26 जणांची माघार

पेडणे; पुढारी वृत्तसेवा :  पेडणे तालुक्यातील एकूण 17 ग्रामपंचायत मधून 448 उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत. बुधवारी एकूण 26 अर्ज मागे घेण्यात आले.

कोरगावमधून कविता कशाळकर, महेश साळगावकर मोरजीमधून चांदणी गडेकर, प्रतिमा शिरोडकर, रामकृष्ण मोरजे आणि पूनम शेटगावकर या चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
केरी पंचायत क्षेत्रांमधून मधुकर सावंत, अशोक नार्वेकर, आकांक्षा शिरगावकर, रेश्मा केरकर आणि रेश्मा तळकर या पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

हरमल पंचायत क्षेत्रातील कायतान फर्नांडिस, दीपक गावडे अर्चना कुडव, सेजल इब्रामपूकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. पालये पंचायत क्षेत्रांमधून हरिश्चंद्र परब, कृष्णा नाईक बाबनी आरोलकर, तेजस्विनी कदम आणि श्रेया परब यांनी आपले अर्ज मागे घेतले.
मांद्रे पंचायत क्षेत्रांमधून विष्णू सावंत, प्रिया कोनाडकर, काजल हडफडकर आणि पॅट्रिक ब्रिटो यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर चोपडे अगरवाडा पंचायत क्षेत्रामधून सुजय गावकर अतुल चोपडेकर यांनी उमेदवारी मागे घेतली.

पंचायतनिहाय उमेदवार
पेडणे तालुक्यातील एकूण 17 ग्रामपंचायतीमधून एकूण 448 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात पोरस्कडे 27, वजरी 14, वारखंड 21, धारगळ 33, तुये 28, तोरसे 17, तांबोसे 22, इब्रामपूर 22, विर्नोडा 19, कोरगाव 43, पार्से 32, हरमल 27, मांद्रे 49, आगरवाडा15, मोरजी 32, केरी 26 आणि पालये 21 असे उमेदवार रिंगणात आहेत.

चार उमेदवार बिनविरोध
या निवडणुकीत चोपडे पंचायत क्षेत्रामधून हेमंत चोपडेकर तोरसेमधून प्रार्थना मोटे, हरमलमधून बर्नाड फर्नांडिस आणि इब्रामपूरमधून दिशा हळदणकर या चार उमेदवार बिनविरोध निवडून आल्या.

 

 

Back to top button