गोवा : न्यायालयात वकिलांनी सोडल्या कागदी होड्या; नेमकं काय झालं? | पुढारी

गोवा : न्यायालयात वकिलांनी सोडल्या कागदी होड्या; नेमकं काय झालं?

गोवा; पुढारी वृत्तसेवा : गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो समुद्र आणि त्यात चालणाऱ्या होड्या. याच गोव्यात मंगळवारी एका न्यायालयात वकिलांनी चक्क होड्या सोडल्या… हा पण वकील म्हटल्यावर कागदपत्रांची कामे, त्यामुळे यांच्या होड्याही कागदीच! नेमकं काय झालं वाचा…

गोवा राज्यात गेल्या तीन दिवसांपासून धुवाँधार पाऊस सुरू आहे. जोरदार वारे आणि धो-धो कोसळणारा पाऊस यामुळे मंगळवारी मडगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या छतावरील ताडपत्री वाऱ्याने उडून गेली. त्यामुळे पोर्तुगीज काळातील जीर्ण झालेल्या न्यायालयाच्या इमारतीमधून पावसाचे पाणी तळमजल्यावर झिरपण्यास सुरुवात झाली. न्यायालयात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. यामुळे न्यायालयातील पाणी काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. यावेळी अनेकांचे बालपण ताजे झाले, अन् काही कर्मचारी व वकील यांनी चक्क कागदी होड्या तयार करून पाण्यात सोडल्या. आता ही कर्मचाऱ्यांनी प्रशासनावर केलेली कुत्सित टीका म्हणावी, की आणखी काय? याची चर्चा सुरू आहे. याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button