गोवा : काणकोण तालुक्यात 42 इंच पाऊस | पुढारी

गोवा : काणकोण तालुक्यात 42 इंच पाऊस

काणकोण, पुढारी वृत्तसेवा :  काणकोण तालुक्याला शुक्रवारी (दि. 1 जुलै) दिवसभर पावसाने झोडपल्याने जनजीवनावर परिणाम झाला. सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. काही भागात गटारातील कचरा रस्त्यावर आला होता. काणकोण तालुक्यात आजपर्यंत 42 इंच इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी काणकोण तालुक्यात 4.6 इंच इतका पाऊस झाला.

पाटणे येथील ओव्हरब्रीज खालील रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. काणकोण बाजारातील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. गेल्या पाच दिवसापासून पावसाने जोर धरल्याने शेतीच्या कामांना जोर आला. गुळे, नुवे, गावडोंगरी, खोतीगाव, आगोंद, खोला व इतर भागात शेतीची कामे जोमाने सुरू आहेत.

Back to top button