गोव्यातील सिद्धीच्या मृत्यूचे गूढ कधी उकलणार? | पुढारी

गोव्यातील सिद्धीच्या मृत्यूचे गूढ कधी उकलणार?

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यातील सिद्धीच्या मृत्यूचे गूढ कधी उकलणार? उत्तर गोव्यातील जगप्रसिद्ध असणारा कळंगुट समुद्र किनारा. या किनाऱ्यावर १२ ऑगस्ट रोजी सिद्धी नाईक नावाच्या १९ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. आता सिद्धीच्या मृत्यूचे गूढ कधी उकलणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अधिक वाचा –

गेल्या काही दिवसापासून संपूर्ण गोवा या घटनेमुळे हादरला आहे. जस्टीस फॉर सिद्धी अशी मोहीम तरुणांनी सोशल मीडियावर सुरु केली आहे. सिद्धीला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने सुरु झाली आहेत. मात्र अनेक तर्कवितर्क, नोंदी आणि जबाब समोर आले होते. त्यामुऴे सिद्धीची हत्या होती की आत्महत्या हा प्रश्न गोवेकरांना त्रासात टाकत आहे.

सिद्धीचे शवविच्छेदन करण्यासाठी आणि अंत्यसंस्कार करण्यासाठीसुद्धा घाई केली गेली. शवविच्छेदनावेळी शरीरातील अन्नांश आणि गुप्तांगाचे नमुने अधिक तपासासाठी ठेवले असल्याची माहिती आहे. गोवा वैद्यकीय इस्पितळाच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. पुढे या नमुन्यांचे काय झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मृतदेह ज्या अवस्थेत सापडला त्यावरील प्रश्न अजूनही कायम आहे.

अधिक वाचा –

कळंगुट पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये तिच्या वडिलांनी म्हटले आहे. एप्रिलपासून कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर सिद्धी अस्वस्थ होती. तिच्यामुळे कुटुंबात सर्वांना कोरोनाची लागण झालीय याचा दोष तिने स्वतःवर ओढवून घेतला होता. असे तिच्या वडिलांनी सांगितले आहे. ही लढाई केवळ सिद्धीसाठी नाही. तर संपूर्ण गोव्यातील मुलींसाठी आहे.

ते म्हणाले, गोव्यात प्रत्येक मुलगी सुरक्षित असावी. अशी आमची इच्छा असल्याचे तिच्या वडिलांनी म्हटले आहे. तिच्या घरच्यांसोबत तिचे खटके उडत होते. तिची मानसिक अवस्था ठिक नसल्याची माहितीसुद्धा पोलिसांना मिळाली आहे.

अधिक वाचा –

सिद्धीने आत्महत्या केली तर तिच्या अंगावरचे कपडे कोठे गेले? असा सवाल संपूर्ण सोशल मीडियातून विचारला जात आहे. तिने प्रवास केला त्या रस्त्यावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही होते. मात्र कॅमेरे काम करीत नसल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे. मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी सरकार घेत नसल्याची टीका सरकारवर होत आहे. सिद्धीला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण गोवा एकत्रित आला आहे.

गोवा
गोव्यातील सिद्धीच्या मृत्यूचे गूढ कधी उकलणार?

…आणि त्याला नोकरी गमवावी लागली.

सिध्दीने मृत्यूपूर्वी काही तास ज्या खासगी बसमधून प्रवास केला होता. त्या बसचालकाने ती तणावात दिसत असल्याचे निरीक्षण पोलिसांकडे नोंदविले होते. मात्र त्याला त्याची नोकरी गमवावी लागलीय.

मुख्यमंत्री काय म्हणतात?

सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाशी संबंधित प्रत्येक मिनिटाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणाला आम्ही गंभीररीत्या घेतले आहे. कसून तपास करण्यासाठीचे आदेश दिले असल्याचे माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी संपूर्ण राज्यात जोर धरून आहे.

हेदेखील वाचा- 

पाहा व्हिडिओ – विद्यार्थ्यांनी CA होण्याचे स्वप्न बाळगावे : C.A डॉ. दिलीप सातभाई

Back to top button