पणजी : सायबर लॅबसाठी केंद्राने मदत करावी | पुढारी

पणजी : सायबर लॅबसाठी केंद्राने मदत करावी

पणजी ः पुढारी वृत्तसेवा गोव्यात सायबर तसेच मोबाईल फॉरेन्सिक लॅबसाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी विनंती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रास केली आहे. दीव येथे शनिवारपासून सुरू झालेल्या पश्चिमी राज्यांच्या क्षेत्रीय मंडळ बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. सावंत उपस्थित होते. 11 रोजी या बैठकीचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू झाली.

बैठकीत पश्चिम विभागातील राज्यांचे मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. पश्चिम क्षेत्रात येणार्‍या राज्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणार्‍या अडचणी व त्यावर मात करून राज्यांच्या किनार्‍यांचे संरक्षण करतानाच राज्यांच्या विकासावर या बैठकीत चर्चा होत आहे. समुद्र किनारे वा इतर मार्गाने तस्करीसरखे गुन्हे गोव्यात घडू शकतात. त्यामुळे किनारी गस्त, मोबाईल फॉरेन्सीक लॅब व सायबर लॅब सुविधासाठी केंद्राने गोव्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी बैठकीत केल्याची माहिती या मंडळाचे उपाध्यक्ष असलेले डॉ. सावंत यांनी दिली आहे.

Back to top button