गोवा : राज्यातील पहिली प्लॅट फूट शस्त्रक्रिया | पुढारी

गोवा : राज्यातील पहिली प्लॅट फूट शस्त्रक्रिया

पणजी : पुढारी वृत्तसेवा : ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. महेंद्र कुडचडकर यांनी येथील हेल्थवे हॉस्पिटलमध्ये राज्यातील पहिली प्लॅट फूट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली. ही शस्त्रक्रिया पाहण्यासाठी आणि शिकण्यासाठी देशभरातील डॉक्टरांचे पथक गोव्यात आले होते. डॉ. कुडचडकर यांनी प्लॅट फूट उपकरणाचे संशोधक अमेरिकेचे डॉ. मायकल ग्रॅहम यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया केली.

या पथकामध्ये अमेरिकेतील ऑर्थोपेडिक आणि ट्रॉमॅटोलॉजी सर्जन डॉ. लुकस कोलोडझीज आणि मुंबईतील पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अशोक जोहरी सहभागी झाले होते. या शस्त्रक्रियेचा समावेश गोवा मेडिकल कॉलेज (गोमेकॉ)च्या कॅडिव्हर कोर्समध्ये करण्यात येणार आहे.

शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर डॉ. महेंद्र कुडचडकर म्हणाले, राज्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण प्रगती आहे. या नवीन प्लॅट फूट शस्त्रक्रियेद्वारे सामान्य विकृतीवर योग्य उपचार केले जाऊ शकतात. हे साधेपण क्रांतिकारी तंत्र रुग्णांमध्ये जादुसारखे काम करेल व लोकांना दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.

हेही वाचलंत का? 

Back to top button