गोवा
Goa Election Update : केपे- एल्टन डिकॉस्टा आघाडीवर, बाबू कवळेकर यांना धक्का?
मडगाव : पुढारी वृत्तसेवा; केपे मतदारसंघात तीनवेळा जिंकून हॅटट्रिक केलेले भाजप सरकारातील उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. केपेत एल्टन डिकॉस्टा आघाडीवर आहेत. बाबू कवळेकर यांना पहिल्या फेरीत ९८१ मते प्राप्त झाली आहे. तर काॅंग्रेसचे एल्टन डिकॉस्टा यांना २४०३ मते मिळालेली आहेत. आपचे राहुल परेरा यांना ६३ तर रेवोल्युशनरी गोवंसचे विशाल गावस देसाई यांना ३५८ मते मिळालेली आहेत.
पहिल्या फेरीतच बाबू कवळेकर यांना पिछाडी मिळाल्याने काँग्रेस समर्थकांमध्ये उत्साह संचारला असून भाजपमध्ये मात्र, चिंतेची स्थिती आहे. बाबू कवळेकर हे तीन वेळा काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. दोन वर्षांपूर्वी राजकिय घडामोडीत त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. भाजप सरकारामध्ये ते उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्री सुद्धा होते.
हेही वाचलंत का?