Rahul Gandhi : राहुल गांधी २ फेब्रुवारी राेजी गाेवा दाैर्‍यावर | पुढारी

Rahul Gandhi : राहुल गांधी २ फेब्रुवारी राेजी गाेवा दाैर्‍यावर

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर प्रचारासाठी २ फेब्रुवारी रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी गोव्यात येत असल्याची माहिती पक्षाच्या राष्ट्रीय माध्यम प्रमुख अलका लांबा यांनी रविवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. (Rahul Gandhi) काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदे यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आल्तिन गोम्स, विठू मोरजकर, नौशाद चौधरी यांची उपस्थिती होती.

ऑक्टोबर २०२१ मध्‍ये हुल गांधी (Rahul Gandhi) गोव्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मच्छिमार बांधवांशी संवाद साधला होता. त्याचबरोबर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये सभा घेतली होती. या सभेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण झाले होते. आता ते निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी गोव्यात येत आहेत.

राहुल गांधी यांच्या दौऱ्याचा पूर्ण कार्यक्रम अद्याप निश्चित झालेला नाही; परंतु मुख्यत्वे साखरी येथे येथील बोर्डवे मैदानावरून राहुल गांधी पक्षाच्या उमेदवारांना समवेत आभासी पद्धतीने सर्व मतदारसंघातील जनतेशी संवाद साधतील. या कार्यक्रमात सुमारे २० हजार लोक सहभागी होतील, अशी अपेक्षा पक्षाच्‍या पदाधिकार्‍यांनी व्‍यक्‍त केली. यावेळी ते ‘गोमंतकीयांच्या हातात सरकार’ या निर्धार संकल्पनेचा शुभारंभ ते करतील.

राज्यात आत्तापर्यंत अपवादात्मक एकाच पक्षाला बहुमताने सरकार मिळाले आहे. बहुतांशवेळा मोडतोडीचे सरकार स्थापन झाली आहेत. राज्यात एकाच पक्षाचे स्थिर सरकार यावे, अशी जनतेची अपेक्षा आहे. भाजप सरकारच्या कारभाराला जनता विटली आहे. त्यामुळे राज्यात कॉंग्रेस हाच पक्ष जनतेच्या निर्णयानुसार स्थिर सरकार देऊ शकतो, असेही यावेळी अलका लांबा म्हणाल्या.

काँग्रेसने यापूर्वी राज्यात लोकांच्या अपेक्षांचा आणि त्यांच्या भावनांचा आदर केला आहे. लोकांच्या मतानुसार पक्षाने अनेक निर्णय घेतले होते, याची आठवण प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी यावेळी करुन दिली.

हेही वाचलं का? 

Back to top button